---Advertisement---

शंभराव्या कसोटीच्या उंबरठ्यावर असलेला इशांत शर्मा म्हणाला, ‘…तर मी शंभर कसोटी खेळू शकलो नसतो’

On: मंगळवार, फेब्रुवारी 23, 2021 1:19 AM
---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या सुरु असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना २४ फेब्रुवारपासून सुरु होणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असून अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) पार पडणार आहे. हा सामना भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मासाठीही खास आहे. कारण हा त्याचा कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना ठरु शकतो.

जर ३२ वर्षीय इशांतला या सामन्यात ११ जणांच्या संघात संधी मिळाली तर तो १०० कसोटी सामने खेळणारा ११ वा भारतीय तर दुसराच भारतीय वेगवान गोलंदाज ठरेल. याआधी भारताच्या वेगवान गोलंदाजांमध्ये केवळ कपिल देव यांनाच १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळता आले आहेत. त्यांनी १३१ कसोटी सामने खेळले आहेत.

सोमवारी(२२ फेब्रुवारी) इशांत पत्रकार परिषदेत कपिल देव यांचा १३१ सामन्यांचा विक्रम मोडणार का, यावर बोलताना म्हणाला, ‘जर तुम्ही सकारात्कमदृष्टीने पाहिले तर हे सोपे आहे आणि मी केवळ एकाच प्रकारात खेळत असल्याने ते, अधिक सोपे होते. मी खूप कृतज्ञ आहे. मी केवळ एका प्रकारात खेळत असल्याने मी १०० कसोटी सामना खेळू शकत आहे. पण, मला वाटत नाही की जर मी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्येही खेळत असतो, तर मी १०० कसोटी खेळू शकलो नसतो. मी केवळ ३२ वर्षांचा आहे, त्यामुळे कदाचित मी इतक्या लवकर तरी हा टप्पा गाठला नसता, कदाचित मला १०० कसोटी खेळण्यासाठी वेळ लागला असता.’

याबरोबरच इशांतला जेव्हा विचारण्यात आले की तू दिर्घकाळ खेळशिल का, त्यावर इशांत म्हणाला, ‘मी खूप पुढचा विचार करत नाही. कारण, तुम्हाला माहित नसते की पुढे काय होणार आहे. तुम्ही एका वेळी एकाच सामन्याचा विचार करु शकता. मला आता माझ्या शरिराबद्दल आणि मला कशाप्रकारच्या ट्रेनिंगची गरज आहे, हे समजले आहे. मी माझ्या रिकव्हरीबद्दल अधिक जागरुक झालो आहे.’

तो पुढे म्हणाला, ‘पूर्वी मी खूप मेहनत करायचो, पण मी कधी माझ्या रिकव्हरीचा विचार केला नव्हता. पण आता मला माहित आहे की जसे तुम्ही मोठे होता, तुम्हाला दिर्घकाळ गोलंदाजी करावी लागेल. त्यामुळे तुम्हाला रिकव्हरीकडे लक्ष देण्याची गरज असते. मी माझ्याकडे लक्ष देत आहे आणि मला वाटते, मला त्याचेच फळ मिळत आहे.’

https://twitter.com/ICC/status/1363873686286069762

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होती १०० कसोटी सामने खेळण्याची संधी 
इशांतला २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेदरम्यान १०० कसोटी सामने खेळण्याची संधी होती. मात्र, त्याआधीच त्याला इंडियन प्रीमीयर लीगमध्ये खेळताना दुखापत झाली. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौरा मुकावा लागला. त्याचमुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात १०० कसोटी सामने खेळण्याच्या संधीलाही मुकावे लागले. याबद्दलही इशांतने खेद व्यक्त केला.

तो याबद्दल म्हणाला, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. मी दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला जाऊ शकलो नाही. पण तुम्ही हे जेवढे लवकर विसराल आणि पुढे जाल, तेवढे चांगले असते. हेच मी माझ्या कारकिर्दीत शिकलो. मी भूतकाळाचा जास्त विचार न करता पुढच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करतो.’

इशांत कारकिर्द –
इशांतने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ९९ कसोटी सामने खेळले आहेत. या ९९ सामन्यात त्याने ३०२ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याने ११ वेळा एका डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तसेच १ वेळा सामन्यात १० विकेट्स घेण्याची कारनामा केला आहे. याशिवाय इशांतने ८० वनडे सामने खेळताना ११५ विकेट्स आणि १४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना ८ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

‘मित्रा, तुला ४ दिवस उशीर झाला’, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९९ धावांची खेळी करणाऱ्या क्रिकेटपटूसाठी अश्विनचे खास ट्विट

“धोनीच्या नेतृत्वात खेळणे म्हणजे स्वप्नपूर्ती”, सीएसकेत निवड झालेल्या क्रिकेटपटूने दिली प्रतिक्रिया

“आयपीएलमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूंना डावलले जाते”, माजी क्रिकेटपटूने केला मोठा आरोप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---