---Advertisement---

ही गोष्ट केली तरच भारत इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकतो – राहुल द्रविड

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि युवा संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने भारतीय संघ वेगवान गोलंदाजांच्या जिवावर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकतो असे म्हणले आहे.

भारतीय संघाने यापूर्वी राहुल द्रविड कर्णधार असताना २००७ साली कसोटी मालिका जिंकली आहे.

२००७ ला इंग्लड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघ आणि आत्ताचा भारतीय संघ तुलनेने सारख्याच ताकदीचे असल्याचे द्रविड म्हणाला.

“२००७ सालच्या संघातील आणि आत्ताच्या संघातील गोलंदाज समान ताकदीचे आहेत. तुम्हाला कसोटी सामना जिंकण्यासाठी गोलंदाजांची कामगिरी चांगली होणे महत्त्वाचे असते. त्यासाठी तुम्हाला २० बळी मिळवावे लागतात. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली तर ही कसोटी मालिका जिंकण्याची भारतीय संघाला चांगली संधी आहे.” असे मत माजी कर्णधार द्रविडने व्यक्त केले.

इंग्लंड संघाबद्दल काय म्हणाला द्रविड-

“इंग्लडच्या दृष्टीने जेम्स अॅन्डरसन आणि ब्रॉड हो दोन वेगवान गोलंदाज महत्त्वाचे असल्याने इंग्लंड या दोघांना पोषक अशी खेळपट्टी तयार करेल. त्यामुळे भारतीय गोलंदाजांनी त्या दृष्टृीने तयारी केली तर इंग्लंडमध्ये भारतीय संघसुद्धा चांगली कामगिरी करु शकतो.”

भारतीय संघाचा इंग्लंड दौरा ३ जुलैपासून सुरू झाला आहे. यातील पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव करत या दौऱ्याची विजयी सुरुवात केली आहे.
भारतीय संघ या दौऱ्यात तीन टी-२०, तीन एकदीवसीय आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-आजचा सामना धोनीसाठी ठरणार खास; वाढदिवसाच्या एक दिवस आधीच…

-भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी२० सामन्याबद्दल…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment