कोरोना व्हायरसचा धोका पाहता काल (14 मार्च) मुंबईमध्ये इंडियन प्रिमीयर लीगच्या गवर्निंग काउंसिलची बैठक पार पडली. ज्यामध्ये आयपीएलला 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्याच्या निर्णयानंतर बदललेल्या परिस्थितींवर चर्चा करण्यात आली. यावेळी बीसीसीआयचे सर्व अधिकारी आणि संघ मालक उपस्थित होते.
आयपीएल (IPL2020) गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीनंतर बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आयपीएलबद्दल बोलताना तो म्हणाला की, कोविड-19 (कोरोना व्हायरस)च्या प्रादूर्भावामुळे आयपीएल 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले. जर परिस्थितीमध्ये सुधारणा झाली तर आयपीएलचा हा हंगाम लहान करण्यात येईल.
यापूर्वी बीसीसीआयने 2020चा 13वा हंगाम 29 एप्रिलला आयोजित केला होता. पंरतु तो आता 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आला आहे.
आयपीएल लहान असेल का? असा प्रश्न विचारल्यानंतर गांगुली उत्तर देत म्हणाला की, “असेच घडेल. कारण तसेही 15 दिवस निघून गेले असतील. त्यामुळे उर्वरित दिवसातच आयपीएलचे सामने घ्यावे लागतील. त्यातही आयपीलमध्ये किती सामने होतील, हे मी सांगू शकत नाही.”
ट्रेंडिंग घडामोडी-
– भारताला पुढील आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी बघावी लागणार ३ महिने वाट…
– जाणून घ्या १४३ वर्षांचा कसोटी क्रिकेटचा इतिहास
– बचपन के यार, सौराष्ट्राच्या विजयाचे शिल्पकार