भारतीय संघासाठी २ एप्रिल हा दिवस खास आहे. १० वर्षांपूर्वी, २ एप्रिल २०११ रोजी भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला होता. विश्वचषक २०११ च्या अंतिम सामन्यात त्यावेळचा भारतीय कर्णधार एमएस धोनीने मारलेला विजयी षटकार आजही चाहत्यांच्या आठवणीत आहे. मात्र, आता या षटकाराबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने मोठे भाष्य केले आहे.
एका षटकाराने विश्वचषक जिंकलेला नाही – गौतम गंभीर
टाईम्स ऑफ इंडियाने घेतलेल्या मुलाखतीत गंभीरने म्हटले आहे की ‘तुम्हाला असे वाटते का की कोणी एका खेळाडूने विश्वचषक जिंकून दिला आहे. जर एक खेळाडू विश्वचषक जिंकून देऊ शकतो, तर भारताने आत्तापर्यंत सर्व विश्वचषक जिंकायला हवे होते. दुर्दैवाने, भारतात केवळ काही वैयक्तिक खेळाडूंची पुजा करण्यात येते. पण माझा त्यावर विश्वास नाही. सांघिक खेळात केवळ व्यक्तीला महत्त्व नसते. त्याच प्रत्येकाच्या योगदानाला महत्त्व असते.’
गंभीरने २०११ विश्वचषकात झहिर खान, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि अन्य खेळाडूंचेही महत्त्व असल्याचे म्हटले आहे. त्याने म्हटले, ‘तुम्ही झहिर खानचे योगदान विसरु शकता का? त्याने अंतिम सामन्यात टाकलेले पहिला स्पेल, ज्यात त्याने सलग तीन षटके निर्धाव टाकली होती. तुम्ही युवराजने ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेली खेळी विसरु शकता का? किंवा सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेले शतक. तुम्ही केवळ त्या एका षटकाराला कसं काय आठवू शकता?’
याबरोबरच गंभीरने २००७ टी२० विश्वचषकात युवराजने इंग्लंडविरुद्ध सलग ६ षटकार मारल्याच्या घटनेचीही आठवण करुन देत म्हटले की ‘त्या एका षटकराने (धोनीने २०११ विश्वचषकात अंतिम सामन्यात मारलेला षटकार) जर विश्वचषक जिंकून दिले असेल तर मला वाटते की युवराजने मग भारताला ६ विश्वचषक जिंकून दिलेत, कारण त्याने एकाच षटकात ६ षटकार मारले आहेत. कोणीही युवराजबद्दल बोलत नाही. त्याने २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ वनडे विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. पण आपण केवळ त्या एकाच षटकाराबद्दल चर्चा करतो.’
गंभीरने मागीवर्षीही केली होती टीका
मागीलवर्षी क्रिकइंफो वेबसाईटने धोनीचा षटकार मारतानाचा फोटो शेअर करत “२०११ साली याच एका शाॅटने करोडो भारतीयांना आनंद दिला,” असे ट्विटमध्ये म्हटले होते. या ट्विटचा स्क्रीनशाॅट घेऊन गंभीरने मागीलवर्षी देखील निशाना साधला होता.
“क्रिकइंफो, तुम्हाला आठवण करुन देतो की हा विश्वचषक संपुर्ण भारताने जिंकला होता. यात सर्व भारतीय खेळाडू व सपोर्ट स्टाफचाही समावेश आहे. बऱ्याच काळापासून तुम्ही केवळ त्या एका षटकारावर अडकून पडला आहात, ” असे गंभीरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
Just a reminder @ESPNcricinfo: #worldcup2011 was won by entire India, entire Indian team & all support staff. High time you hit your obsession for a SIX. pic.twitter.com/WPRPQdfJrV
— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) April 2, 2020
गौतम गंभीरने केली होती अफलातून खेळी
भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली हा विश्वचषक जिंकला होता. अंतिम सामन्यात गौतम गंभीरने तिसऱ्या क्रमांकावर या सामन्यात ९७ धावांची खेळी केली होती तर धोनीने ५व्या क्रमांकावर नाबाद ९१ धावांची खेळी केली होती. या दोनही खेळी भारतासाठी अतिशय महत्त्वाच्या ठरल्या होत्या.
या सामन्यात अनेकांना गौतम गंभीरला सामनावीर पुरस्कार मिळेल असे वाटले होते. परंतु एमएस धोनीला हा सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्यावरुन आजही अनेक वाद क्रिकेटप्रेमी तसेच तज्ञांमध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बिहारच्या ‘या’ युवा खेळाडूचा समावेश झाला दिल्ली कॅपिटल्सच्या संघात, वाचा संपूर्ण कारकीर्द
शाब्बास भावा..!! पाकिस्तानविरुद्ध खेळणार का? खलील अहमदने एका वाक्यात जिंकले कोट्यवधी भारतीयांचे हृदय
कधीकाळी हॉकी खेळणारा ‘हा’ खेळाडू आयपीएलमध्ये केकेआरकडून पदार्पणासाठी सज्ज