बीसीसीआयने सोमवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र, रोहित शर्माला दुखापतीमुळे एकाही संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याला आयपीएलमध्ये खेळताना किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे जर पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहितला भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही, म्हणजेच तो आयपीएलमधूनही बाहेर झाला असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.
जर खरंच रोहित आयपीएलच्या 13 व्या हंगामातून बाहेर पडला तर मुंबई इंडियन्सला मोठे नुकसात होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की रोहित हा मुंबई इंडियन्सचे गेले 8 वर्षे नेतृत्व करत आहे. तो मुंबईकडून सर्वाधिक सामने खेळणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्यामुळे तो संघातील एक अनुभवी खेळाडू आहे. रोहितने अनेकदा मुंबईकडून खेळताना शानदार खेळी साकारल्या आहेत. त्याचबरोबर रोहित या हंगामातही चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने 9 सामन्यात 260 धावा केल्या होत्या. त्यामुळे रोहितसारख्या खेळाडूची उणीव भरुन काढणे मुंबई इंडियन्ससाठी सोपे नसेल.
रोहित शर्मा आयपीएल बाहेर गेला तर मुंबईचे काय होणार नुकसान?
1. 4 वेळा आयपीएल विजेता कर्णधार
रोहितने 2013 पासून मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना 4 वेळा आयपीएल विजेतेपद संघाला मिळवून दिले आहे. त्याचा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून असणारा अनुभव फार महत्त्वाचा आहे. गेले 8 वर्षे तो मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळत असल्याने त्याला संघाची इतंभूत माहिती आहे. तो जेव्हापासून कर्णधार झाला आहे, तेव्हापासून मुंबई इंडियन्सला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. तसेच यंदाच्या हंगामातही त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने शानदार कामगिरी करत गुणतालिकेत अव्वल क्रमांक बराच वेळ राखला आहे. त्यामुळे जर तो बाहेर गेला तर मुंबईला त्याच्या कर्णधारपदाच्या अनुभवालाही मुकावे लागेल.
2. संघाचे मनोबल
रोहित संघातील प्रमुख खेळाडू आणि नियमित कर्णधार असल्याने नक्कीच तो बाहेर गेल्याने संघाचे मनोबल खचेल. मागील काही वर्षात मुंबई इंडियन्स संघासाठी रोहित हा केंद्रबिंदू राहिला आहे. त्यामुळे असा खेळाडू अचानक बाहेर जाण्याने संघाच्या मनस्थितीवर परिणाम होईल.
3. पोलार्डचा कर्णधार म्हणून आयपीएलमधील तोडका अनुभव
रोहित जर बाहेर गेला तर कायरन पोलार्ड मुंबईचे नेतृत्व करेल. आयपीएल 2020 च्या मुंबईच्या मागील 2 सामन्यातही पोलार्डनेच रोहितच्या अनुपस्थितीत मुंबईच्या नेतृत्वाची धूरा सांभाळली. पण असे असले तरी पोलार्डला आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याचा फारसा अनुभव नाही. त्याचा फटका मुंबई इंडियन्सला बसू शकतो. पोलार्डने आयपीएलमध्ये केवळ 3 सामन्यात मुंबईचे नेतृत्व केले आहे. त्यातील 2 सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे तर 1 सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
४. रोहितचे एकहाती सामना फिरवुन देण्याचे कौशल्य –
रोहित हा एक आक्रमक शैलीचा सलामीवीर आहे. त्याच्याकडे मोठे फटके मारण्याचे आफाट कौशल्य आहे. त्यामुळे तो खेळपट्टीवर उभा असताना अनेकदा प्रतिस्पर्धी संघ दबावात असतो. त्याच्याकडे मोठे फटके मारण्याच्या असलेल्या क्षमतेमुळे तो एकहाती सामनाही फिरवू शकतो, हे त्याने अनेकदा करुनही दाखवले आहे.
तसेच जर तो बाहेर गेला तर मुंबईकडे त्याच्याऐवजी भारतीय सलामीवीर म्हणून भक्कम पर्याय नाहीत. त्यांनी मागील 2 सामन्यात इशान किशनला रोहितच्या जागेवर खेळवले. मात्र, इशानला रोहित इतका अनुभव नाही. तसेच जर ख्रिस लिनला रोहितच्या जागेवर खेळवावे लागले तर क्विंटॉन डिकॉक, पोलार्ड, ट्रेंट बोल्ड आणि जेम्स पॅटिंसन यांच्यातील एका परदेशी खेळाडूला अंतिम 11 मधून बाहेर बसावे लागेल, जे मुंबई इंडियन्ससाठी धोक्याचे ठरु शकते. त्यामुळे मुंबई इंडियन्सला सलामीसाठी रोहित बाहेर पडला तर मोठा फटका बसेल.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्माची आयपीएलमधून माघार? मुंबई इंडियन्सने दिली महत्वाची माहिती…
मुंबईच्या लढवय्या खेळाडूची ११ वर्षांची प्रतिक्षा काही संपेना, पुन्हा नाकारली टीम इंडियात जागा
भुवी, इशांतची दुखापत पडली पथ्यावर, पहिल्यांदाच मिळाले कसोटी संघात स्थान
ट्रेडिंग लेख –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
आयपीएलमध्ये डंका वाजलाच, आता ‘मिशन ऑस्ट्रेलिया’; ‘हा’ आर्किटेक्ट बांधणार संघाच्या विजयाचा पूल
एमएस धोनीच्या गावचा पोरगा, जो चेन्नईकडून आयपीएलमध्ये करतोय पदार्पण