---Advertisement---

रोहित एशिया कप खेळला तर या ४पैकी एका खेळाडूला बसावे लागणार घरी

On: सोमवार, मार्च 23, 2020 5:55 PM
---Advertisement---

मागील २ वर्षांपूर्वी २०१८मध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने आशिया चषक खेळला नव्हता. त्यावेळी त्याच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्व रोहित शर्माने केले होते. आता यावर्षी होणाऱ्या आशिया चषकात विराटने विश्रांती घेतली तर, त्याच्या जागी भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी रोहितला मिळण्याची शक्यता आहे.

रोहितने (Rohit Sharma) २०२०च्या आशिया चषकात भारतीय संघाचे नेतृत्व केले तर, ४ क्रिकेटपटूंना भारतीय संघात स्थान मिळणे कठीण होईल.

पृथ्वी शॉ-

शिखर धवनला (Shikhar Dhawan) दुखापत झाल्यामुळे त्याच्या जागी पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) न्यूझीलंड दौऱ्यात संधी मिळाली होती. तसेच नुकतीच रद्द झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा दुखापतींमुळे तो संघातून बाहेर होता. त्यामुळे शॉला संघात संधी मिळाली होती.

न्यूझीलंड दौऱ्यात शॉला चांगली कामगिरी करता आली नव्हती. अशामध्ये आता जर रोहित आशिया चषकात पुनरागमन केले तर निश्चितच शॉ संघातून बाहेर जाण्याची शक्यता आहे.

खरं तर २०१८च्या आशिया चषकाप्रमाणे धवन आणि रोहितची जोडी २०२०च्या आशिया चषकातही सलामीला फलंदाजी करताना दिसेल. त्यामुळे शॉला संघात स्थान मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.

शुबमन गिल-

नुकत्याच रद्द झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शुबमन गिलची (Shubman Gill) निवड करण्यात आली होती. परंतु मालिका रद्द झाल्यामुळे त्याला आपली कामगिरी दाखविण्याची संधी मिळाली नाही.

जर आशिया चषक २०२०मध्ये रोहित शर्माला नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर, शुबमन गिलऐवजी मुंबई इंडियन्स संघातील सहकारी सूर्यकुमार यादवला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

यादव देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अशात रोहित आपल्या नेतृत्वात यादवला भारतीय संघात संधी देऊ शकतो. त्यामुळे जर यादवला संघात संधी मिळाली तर गिलला संघातून बाहेर जावे लागू शकते.

रिषभ पंत-

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रिषभ पंतने (Rishabh Pant)  भारतीय संघातील आपले स्थान गमावले आहे. यासाठी पंत स्वत: जबाबदार आहे. विश्वचषकानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला आपले स्थान पक्के करण्यासाठी अनेक संधी दिली. परंतु त्याला संधीचे सोने करता आले नाही आणि तो फ्लॉप राहिला होता.

यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघ व्यवस्थापन केएल राहुलला (KL Rahul) ११ जणांच्या भारतीय संघात स्थान देत आहे. राहुलचा फॉर्म शानदार राहिला आहे. तसेच तो मधल्या फळीत फलंदाजी करताना यशस्वी राहिला आहे.

पंतने खराब कामगिरी करूनही विराट त्याला आपली कामगिरी सिद्ध करण्यासाठी अनेक संधी देत आहे. परंतु जर रोहितला कर्णधारपद मिळाले तर पंतची कारकीर्द धोक्यात येऊ शकते.  तसेच त्याला आशिया चषकात संंघातूनही वगळण्यात येऊ शकते.

कुलदीप यादव-

आयपीएल २०१९ पासूनच भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) खराब फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत हवी तशी चांगली कामगिरी केलेली नाही. अशात संघ व्यवस्थापनाने २ फिरकीपटू गोलंदाज म्हणून रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) या गोलंदाजांचा ११ जणांच्या यादीत समावेश केला आहे.

सध्यातरी कुलदीपला भारतीय संघातील स्थान मिळणे कठीण बनले आहे. जर कुलदीपला २०२०च्या आशिया चषकापूर्वी  चांगली कामगिरी करता आली नाही आणि रोहितला कर्णधारपद मिळाले तर, त्याला २०२०च्या आशिया (Asia Cup 2020) चषकात संघातून बाहेर केले जाऊ शकते.

आयपीएल २०२० आणि भारताचा श्रीलंका दौरा कुलदीपसाठी खूप महत्त्वापूर्ण असणार आहे. यातूनच त्याच्या आशिया चषकातील निवडीबाबत विचार केला जाऊ शकतो.

ट्रेंडिंग घडामोडी-

-क्रिकेटपटूंनो घरी आहाता ना! मग हे काम करा

-टॉप ५: सर्वाधिक काळ वनडे क्रिकेट खेळलेले खेळाडू !

-टॉप ५: वनडेत सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---