भारताला त्यांच्या क्रिकेट इतिहासातील पहिला विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव यांनी पुन्हा एकदा युवा खेळाडूंवर निशाणा साधला आहे. कपिल यांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 1983 मध्ये देशासाठी पहिला वनडे विश्वचषक जिंकला होता. कपिल यांच्या मते युवा खेळाडू नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे तक्रारी करत असतात. पण ही या खेळाडूंसाठी संधी आहे की, ते भारताचे प्रतिनिधित्व करतात. याविषयी बोलताना त्यांनी युवा खेळाडूंवर जोरदार टीका केली आहे. ज्या खेळाडूंना देशासाठी खेळणे हा दबाव वाटतो, त्यांनी क्रिकेट सोडून केळीचा गाडा लावला पाहिजे, असे कपिल यावेळी म्हणाले.
भारतीय संघातील युवा खेळाडूंकडून नेहमीच कामाचा तान आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत असताना असणाऱ्या दबावाविषयी तक्राक केली जात असते. अपिल देव (Kapil Dev) यानी नेमका हाच मुद्दा पकडत या खेळाडूंवर निशाणा साधला आहे. कपिल यांच्या मते जे खेळाडू दबाव झेलू शकत नाहीत, त्यांनी केळीचे दुकान लावले पाहिजे, तसेच अंडी देखील विकली पाहिजेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कपिल देव कहिन : "केले की दुकान लगाओ, अंडे बेचो"#IPL में प्रेशर को लेकर कपिल देव का बयान वायरल #KapilDev #viral #KapilDev pic.twitter.com/C26eaXAgUI
— Satyajeet Panwar (@Satyajeet_IN) December 20, 2022
कोलकात्यामध्ये एका सभेत बोलताना कपिल देव म्हणाले की, “खेळाडू म्हणत आहेत की आम्ही आयपीएल खेळत आहोत, त्यामुळे खूप दबाव आहे. हे शब्द आता सामन्य झाले आहेत. अशा खेळाडूंना मी म्हणतो की, त्यांनी खेळलेल नाही पाहिजे. तुम्हाला खेळण्यासाठी कोणी जबरदस्ती केली आहे का? जर तुम्ही या पातळीवर खेळत असाल, तर दबाव असणारच. तुमच्यावर टीका होत असतील, तर कौतुक देखील होत असतेच. टीकांना तुम्ही घाबरत असाल, तर खेळू नका. देशाचे प्रतिनिधित्व करताना तुमच्यावर दबाव असूच कसा शकतो? 100 कोटी लोकांच्या देशातून तुम्हा 20 जणांना खेळण्याची संधी मिळते आणि तुम्ही म्हणता दबाव आहे. तुम्हाला देशासाठी खेळण्याचा अभिमान वाटला पाहिजे. तुम्हाला लोकांचे एवढे प्रेम मिळत आहे.”
“तुम्हाला स्वतःवर काम करायचे नसेल, तर करू नका. तुमच्यावर कोणी बळजबरी केली नाहीये. जा आणि केळीचे दुकान लावा. अंडे विका. तुम्हाला ही एक संधी मिळाली आहे, तर तुम्ही ती संधी दबाव म्हणून नाही, तर याचा आनंद घेतला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही असे करायला सुरुवात कराल, त्यादिवशी तुमचे काम सोपे होईल. पण जर तुम्ही याकडे दबाव म्हणून पाहत असाल, तर परिणाम चांगले येणार नाहीत,” असेही कपिल पुढे बोलताना म्हणाले. (If you feel the pressure to play, sell bananas, Kapil Dev’s big statement)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BANvIND: ‘मॅचविनर’ कुलदीपला बाहेर केल्याने भडकले चाहते, कर्णधार राहुलची लावली क्लास
पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना संघाला विजेतेपद