---Advertisement---

NZ vs PAK: चाहत्याने ‘चाचा’ म्हणल्यावर इफ्तिखार अहमदला राग अनावर; केलं असं काही, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, जानेवारी 15, 2024 3:56 PM
Iftikhar-Ahmed-Calls-Chacha
---Advertisement---

Pakistan vs New Zealand 2nd T20I: पाकिस्तान संघाची खराब कामगिरी सुरूच आहे. रविवारी (14 जानेवारी) पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही यजमान किवी संघाकडून पाकिस्तानला 21 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर पडला असून पराभवासह मालिका गमवावी लागणार आहे. उभय संघांमधील दुसऱ्या सामन्यादरम्यान एक विचित्र घटना पाहायला मिळाली, जेव्हा पाकिस्तानी संघाचा खेळाडू इफ्तिखार अहमद याला एका चाहत्याने चाचा म्हटल्याने रागाने लाल झाला.

दुसऱ्या सामन्यादरम्यान इफ्तिखार अहमद (Iftikhar Ahmed) सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. तेव्हा एका चाहत्याने त्याला चाचा म्हटले. इफ्तिखारला चाहत्याचे हे म्हणणे अजिबात आवडले नाही आणि रागाने मागे वळून पाहत त्याने चाहत्याला गप्प राहण्याचा सल्ला दिला. व्हिडिओमध्ये चाहत्याने नंतर इफ्तिखारला आम्ही तुझे चाहते असल्याचेही सांगितले. यानंतरही इफ्तिखारचा राग शांत झाला नाही आणि तो वारंवार चाहत्यांना गप्प राहण्याचा सल्ला देताना दिसला.

इफ्तिखारच्या संतापाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावरील चाहत्यांना इफ्तिखारचे हे वागणे अजिबात आवडलेले नाही. दुसऱ्या टी-20 सामन्यात इफ्तिखार अहमदची बॅट अजिबात चालली नाही. या सामन्यात त्याच्या बॅटमधून फक्त 4 धावा आल्या.

दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंड संघाने शानदार फलंदाजी करत पाकिस्तानला 195 धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 173 धावांत गडगडला आणि सामना 21 धावांनी गमवावा लागला. पाकिस्तानसाठी बाबर आझमने सर्वाधिक 66 धावांची खेळी खेळली पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. (Iftikhar Ahmed gets angry after fan calls him Chacha Something like that watch the video)

हेही वाचा

आफ्रिकेने विश्वचषकासाठी केली नव्या कर्णधाराची घोषणा, ‘या’ अष्टपैलू खेळाडूकडे दिली जबाबदारी
IND vs AFG: यशस्वी जयस्वालने सांगितले यशाचे रहस्य; म्हणाला, ‘जेव्हाही मी विराट…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---