---Advertisement---

30 वर्षीय खेळाडूचा धमाका! आयपीएल लिलावात दुर्लक्षित, आता सराव सामन्यात ठोकलं वादळी शतक

On: सोमवार, फेब्रुवारी 2, 2026 9:28 PM
---Advertisement---

टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर सध्या सराव सामने खेळवले जात आहेत. ‘इंडिया ए’ आणि अमेरिका (India A vs America) यांच्यातील सामन्यात 30 वर्षीय नारायण जगदीशनने (N. Jagadeesan) आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे, आयपीएल 2026 च्या लिलावात जगदीशन ‘अनसोल्ड’ (त्याला कोणीही विकत घेतले नव्हते) राहिला होता.

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये झालेल्या या सामन्यात जगदीशनने अमेरिकेच्या गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. त्याने केवळ 55 चेंडूत 104 धावांची जबरदस्त खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 4 षटकार ठोकले. जगदीशनने आपले शतक अवघ्या 49 चेंडूत पूर्ण केले आणि त्याचा स्ट्राईक रेट 189.09 चा होता.

दुखापतीनंतर मैदानात परतलेल्या तिलक वर्माने (Tilak Verma) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 24 चेंडूत 38 धावा केल्या ज्यात 3 चौकार, 2 षटकार सामील होते. त्याने जगदीशनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली.

संघाचे नेतृत्व करणाऱ्या बडोनीने अखेरच्या षटकांत तुफानी फटकेबाजी केली. त्याने फक्त 26 चेंडूत नाबाद 60 धावा केल्या. अमेरिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. ‘इंडिया ए’ने या संधीचे सोने करत निर्धारित 20 षटकांत अमेरिकेसमोर 239 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---