मुंबई इंडियन्सने युनाईटेड अरब अमिराती इंटरनॅशनल टी२० (आयएल टी२०) लीगच्या पहिल्या हंगामासाठी संघ जाहीर केला आहे. या लीगमधील मुंबईच्या संघाचे नाव एमआय एमिरेट्स असे आहे. या संघामध्ये मुंबई इंडियन्सच्या सध्याच्या आणि काही जुन्या खेळाडूंचा समावेश आहे. टी२० लीगमधील मुंबई इंडियन्सचा हा एकूण तिसरा संघ आहे. त्यांची दक्षिण आफ्रिकेच्या टी२० लीगमध्ये एमआय केपटाऊन ही फ्रॅंचायजी विकत घेतली आहे.
एमआय एमिरेट्सच्या या १४ जणांच्या संघात ट्रेंट बोल्ट (Trent Boult) आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यांचा संघात समावेश आहे. हे दोघे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या संघाकडून खेळले आहेत. बोल्टला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामासाठी रिटेन केले नव्हते. तर आता बोल्ट आणि पोलार्ड पुन्हा एकदा निळ्या आणि गोल्डन जर्सीत एकत्र खेळताना दिसणार आहेत. यामध्ये ड्वेन ब्रावो आणि निकोलस पूरन यांचा देखील समावेश आहे.
या लीगच्या संघांमध्ये काही स्थानिक खेळाडूंनाही भविष्यात करारबद्ध करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईच्या संघात भारतीय खेळाडू दिसण्याची शक्यता फारच कमी आहे. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय खेळाडूंना विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळण्याची समंती दिलेली नाही.
आयएल टी२० लीग ही पुढच्या वर्षी खेळली जाणार आहे. याची सुरूवात ६ जानेवारीपासून होणार असून ती २३ फेब्रुवारीपर्यंत खेळली जाणार आहे. यामध्ये ६ संघ खेळणार आहेत. तर एकूण ३४ सामने खेळले जाणार आहेत.
एमआय एमिरेट्सने करारबद्ध केलेले खेळाडू
कायरन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, निकोलस पूरन, ट्रेंट बोल्ट, आंद्रे फ्लेचर, इम्रान ताहीर, समित पटेल, विल स्मिड, जॉर्डन थॉम्पसन, नजीब झादरान, झहीर खान, फजलहक फारुखी, ब्रॅडली व्हील, बॅस डी लीड.
https://twitter.com/MIEmirates/status/1558010703692324864?s=20&t=T4B4Zmv0jp9tw-Iwgfhaow
या लीगमध्ये भारतातील मुंबई बरोबरच कोलकाता नाईट रायडर्सने अबुधाबी नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्सने दुबई कॅपिटल्स, अदानी स्पोर्टसलाईनने गल्फ जायंट्स या फ्रॅंचायजी विकत घेतल्या आहेत. तसेच चेन्नई सुपर किंग्जनेही संघ विकत घेतला आहे. या लीगचे सामने भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म झी५ (Zee5) वर प्रक्षेपीत होणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकापूर्वी सूर्यकुमार यादवने घेतली लक्झरी कार, किंमत ऐकुण तुम्हीही व्हाल हैरान
चांगला फॉर्म, सर्वाधिक धावा; तरीही आशिया चषकासाठी दुर्लक्षित राहिले ‘हे’ दोघे भारतीय
गांगुलीची ‘दादा’गिरी पुन्हा होणार सुरू! महत्वाच्या सामन्यासाठी टीम इंडिया जाहीर






