---Advertisement---

“मला खात्री आहे, विराट भैय्या भारताला इंग्लंडमध्ये मालिका जिंकून देईल”

On: बुधवार, ऑगस्ट 4, 2021 4:17 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका बुधवारी (४ ऑगस्ट) पासून सुरू झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर ३-१ असा अपमानजनक पराभव पत्करावा लागल्यानंतर इंग्लंड मायदेशात विजय मिळवून पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न करेल. तर भारत १४ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये मालिका विजयाचा प्रयत्न करताना दिसेल. या मालिकेबद्दल भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आपले मत मांडले आहे.

चहलचा असा विश्वास आहे की, ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच झालेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय संघामध्ये प्रचंड आत्मविश्वास असेल.

टाइम्स ऑफ इंडियाशी संभाषणादरम्यान चहल म्हणाला की, “ही मालिका खूप रोमांचक असेल. मालिका जिंकण्यासाठी भारताला प्रबळ दावेदार म्हणून मी पाहतो. मायदेशात ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आपण आत्मविश्वासाने परिपूर्ण आहोत. मला खात्री आहे की, विराट भैया इंग्लंडमध्ये भारताला मालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करेल.”

चहल पुढे म्हणाला की, “आपल्याकडे असे गोलंदाज आहेत. जे कधीही यश मिळवू शकतात. आपल्याकडे विराट भैय्या, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रोहित भैय्या आणि रिषभ पंत आहेत. जे उत्तम फॉर्ममध्ये आहेत. गोलंदाजीमध्ये आपल्याकडे बुमराह, शमी भैय्या आणि इशांत भैय्या आहे. आर आश्विन आणि रविंद्र जडेजा देखील आहे. त्यामुळे आम्हाला इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे.

ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर मयंक अगरवाल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. मयंक व्यतिरिक्त, वॉशिंग्टन सुंदर आणि शुभमन गिल यापूर्वीच संपूर्ण कसोटी मालिकेतून दुखापतींमुळे बाहेर झाले आहेत. अशा परिस्थितीत इंग्लंडमध्ये मालिका जिंकणे भारतीय संघासाठी मोठे आव्हान असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

वाईट झालं राव! सुवर्ण पदकाचं स्वप्न तर भंगलं; आता कांस्य पदकासाठी दीपक पुनिया करणार दोन हात

उत्तुंग भरारी! रवी दहियाने अंतिम सामन्यात प्रवेश करत रचला इतिहास; बनला केवल दुसरा भारतीय कुस्तीपटू

‘रोहित फक्त मायभूमीत खेळतो, त्याला संघात ठेवण्यात कसलाही अर्थ नाही,’ माजी क्रिकेटरची बोचरी टीका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---