भारतीय संघाने वेस्ट इंडीज दौऱ्यात घवघवीत यश मिळवले आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने यजमान संघाला क्लीन स्वीप (०-३) दिला होता. तसेच उभय संघातील टी-२० मालिका भारताने १-४ अशा अंतराने नावावर केली. भारतीय युवा खेळाडूंना या वेस्ट इंडीज दौऱ्यात जबरदस्त प्रदर्शन केले असून आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या शनिवारी (२७) सुरू होणाऱ्या आशिया चषकात मात्र भारताचे प्रमुख खेळाडू खेळताना दिसतील.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ३६ वर्षीय अनुभवी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) भारताचा कर्णधार होता. नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अनुपस्थित असल्यामुळे आता झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत देखील धवन संघाचे नेतृत्व करणार आहे. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हे मोठे खेळाडू पुन्हा एकदा अनुपस्थित असतील. दरम्यान, संघ व्यवस्थापन आशिया चषक आणि आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी संघातील प्रमुख खेळाडूंना ताजेतवाने ठेवू इच्छित आहे आणि याच कारणास्तव झिम्बाब्वे दौऱ्यात त्यांसा संघातून वगळले गेले आहे.
दरम्यान, विराट कोहली (Virat Kohli) सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब काळातून जात आहे. मागच्या अडीच वर्षांपासून विराटने एकही आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत शतक केले नाहीये. एकेकाळी ज्या गोलंदाजांच्या विरोधात षटकारांचा पाऊस पाडायचा, आज ते गोलंदाज विराटला स्वस्तात बाद करत आहेत.
आगामी आशिया चषक २७ ऑगस्टपासून सुरू होणार असून पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाईल. दुसरा सामना भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यात खेळला जाईल. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध अभियानाची सुरुवात करणारा भारतीय संघ या सामन्यात यश मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. मागच्या वर्षी आयसीसी टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा दारून पराभव केला होता. आता भारतीय संघाकडे या पराभवाचा बदला घेण्याची चांगली संधी आहे. उभय संघातील या सामन्यात दोन्ही बाजूचे धुरंदर खेळतील अशी, अपेक्षा आहे.
आशिया चषकाचे आयोजन श्रीलंकेत केले गेले होते. परंतु त्याठिकाणी उद्भवलेले राजकीय आणि आर्थिक संकट गंभीर असल्यामुळे स्पर्धा आता यूएईत खेळली जाणार आहे. स्पर्धेत एकूम ६ संघ खेळणार असून अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी पार पडेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दीराने रौप्य तर वहिनीने जिंकले थेट ‘सुवर्ण’पदक! कॉमनवेल्थमध्ये स्टार्क घराण्याचा दबदबा
INDvsZIM। ‘भारताच्या पुढील दौऱ्याचे वेळापत्रक आणि बरंच काही…’, फक्त एका क्लिकवर
Breaking: फायनलमध्ये पीव्ही सिंधूचा ‘गोल्डन स्मॅश’! भारताच्या पदरात १९वे सुवर्ण पदक