---Advertisement---

आज शेवटचा वनडे खेळणाऱ्या इम्रान ताहिरने दिला भावनिक संदेश

On: शनिवार, जुलै 6, 2019 2:02 PM
---Advertisement---

मँचस्टर। आज(6 जूलै) ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 2019 विश्वचषकाच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचे या विश्वचषकातील आव्हान या आधीच संपले असल्याने हा सामना दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिरचा कारकिर्दीतील शेवटचा वनडे सामना असणार आहे.

या सामन्यानंतर तो निवृत्ती घेणार आहे. त्यामुळे आज शेवटचा वनडे खेळण्याआधी ताहिरने भावनिक ट्विट केले आहे.

त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘दक्षिण आफ्रिकेकडून वनडे खेळण्यासाठी मी शेवटचे मैदानात उतरणार आहे, हा माझ्यासाठी भावनिक क्षण असेल. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत जे माझ्या पाठिशी उभे राहिले त्या सर्वांना आणि विशेषत: माझे स्वप्न सत्यात उतरवल्याबद्दल दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला मनापासून धन्यवाद. उद्या माझ्याकडे जे असेल ते देईल.’

40 वर्षीय ताहिरने 2011 च्या विश्वचषकातून दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने आत्तापर्यंत 106 वनडे सामने दक्षिण आफ्रिकडून खेळले. आजचा त्याचा 107 वा वनडे सामना असणार आहे.

त्याने आत्तापर्यंत 106 वनडे सामन्यात 172 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 20 कसोटी सामन्यात 57 विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने दक्षिण आफ्रिकेकडून 38 टी20 सामने खेळताना 63 विकेट्स घेतल्या आहेत.

विशेष म्हणजे ताहिर विश्वचषकामध्ये दक्षिण आफ्रिकेचा सर्वाधिक विकेट्स घेणाराही गोलंदाज आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून 3 विश्वचषक खेळताना आत्तापर्यंत 21 सामन्यात 39 विकेट्स घेतल्या आहेत.

आज ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका सामन्यात विजय मिळवून ताहिरला विजयी निरोप देणार का हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

उपांत्य फेरीत प्रवेश करताच न्यूझीलंडने केली या विश्वविक्रमाची बरोबरी

दोन दिवसांपूर्वीच बेअरस्टोने केलेला विश्वविक्रम आता झाला बाबर आझमच्या नावावर

चौथ्या क्रमांकवर भारताने या खेळाडूला खेळवावे, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराचे मत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment