---Advertisement---

जेव्हा गांगुली Time Out बाद होता होता राहिलेला, पण स्मिथने दाखवलेली खिलाडूवृत्ती, वाचा काय घडलेलं

Sourav ganguly in test match against south africa 2007
---Advertisement---

श्रीलंकेचा दिग्गज अँजेलो मॅथ्यूज याच्यासाठी बांगलादेशविरुद्धचा सामना निराशाजनक ठरला. एकही चेंडू न खेळता त्याने विकेट गमावली. शाकिब अल हसन याच्या अपीलनंतर पंचांनी त्याला टाईम आऊट नियमानुसार बाद घोषित केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने बाद होणारा मॅथ्यूज पहिलाच खेळाडू ठरला आहे. पण मॅथ्यूजसोबत घडलेल्या या प्रकारानंतर क्रिकेटच्या जाणकारांनी सौरब गांगुली याला 2007 साली मिळालेल्या जीवनदानाची आठवण काढली.

अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) सोमवारी (6 नोव्हेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट पद्धतीने बाद होणारा पहिला खेळाडू बनला. यापूर्वी एकही खेळाडू अशा पद्धतीने बाद झाल्याचे आंतरराष्ट्रीय सामन्यात पाहायला मिळाले नव्हते. असे असले तरी, 2007 साली सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्या नावापुढे हा नकोसा विक्रम होता होता राहिला. मॅथ्यूज टाईम आऊट पद्धतीने वाद होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरा खेळाडू ठरू शकत होता. मात्र, 14 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिका संघाने घेतलेल्या एका निर्णयामुळे असे होऊ शकले नाही.

होय, 2007 साली भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होता. केप टाऊनमध्ये उभय संघांतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना सुरू होता. पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिका 1-1 अशा बरोबरीवर होती. शेवटचा सामना जिंकणाऱ्या संघाला मालिका विजयासह बक्षीस म्हणून मोठी रक्कम दिली जाणार होती.सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचे सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग आणि वसीम जाफर यांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या होत्या.

दुसऱ्या डावात अवघ्या 14 चेंडूच खेळ पूर्ण झाला तेव्हा दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते. खेळपट्टीवर राहुल द्रविड होता आणि सचिन तेंडुलकर चौथ्या क्रमांकावर नेहमीप्रमाणे फलंदाजीला येणे अपेक्षित होते. पण त्याच्या एक दिवस आधीच सचिन मैदानाबाहेर गेला होता. नियमानुसार विकेट पडल्यानंतर पुढच्या फलंदाजाने तीन मिनिटाच्या आतमध्ये खेळीला सुरुवात केली पाहिजे. पण सचिनसाठी हे शक्य नव्हते. अशात पाचव्या क्रमांकावर असणार व्हीव्हीएस लक्ष्मण फलंदाजीला येईल, असे सर्वांना वाटले. पण लक्ष्मण ऐन वेळी अंघोळ करत असल्यामुळे त्यालाही खेळपट्टीवर येता आले नाही.

सलामीवीर फलंदाजा एवढ्या झटपट बाद झाल्यामुळे भारतीय संघाची चांगलीच अडचण झाली होती. पंचांकडून भारतीय ड्रेसिंग रुममध्ये फलंदाज पाठवण्याचा संदेश आला. ऐन वेळी सहाव्या क्रमांकावर खेळणाऱ्या सौरव गांगुली याला फलंदाजीसाठी पाठवले गेले. गांगुली देखील मैदानात उतरण्यासाठी तयार नव्हता. तो ड्रेसिंग रुममध्ये भारतीय संघाचा ट्रॅकसूट घालून सामन्याचा आनंद घेत होता. पण संघासाठी खेळपट्टीवर जाण्याच वेळी आल्यानंतर तो काही मिनिटांमध्ये तयार झाला आणि मैदानात उतरला.

वसीम जाफर याच्या रुपात भारतीय संघाने सकाळी 10.44 वाजता दुसरी विकेट गमावली होती. नियमानुसार सचिन 10.48 वाजता खेळीला सुरुवात करणे अपेक्षित होते. पण सचिन आणि त्यापाठोपाठ लक्ष्मण देखील अनुपलब्ध असल्यामुळे गांगुलीने सकाळी 10.49 वाजता फलंदाजीला सुरुवात केली. म्हणजेच एकूण 6 मिनिटांचा वेळ या सर्व प्रकरणात खर्च झाला. नियमानुसार पंच सौरव गांगुली याला टाईम आऊट नियमानुसार बाद घोषित करू शकत होते. पण त्यासाठी विरोधी संघाने अपील करणेही गरजेचे होते.

पण या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व करणाऱ्या ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) याने खेळाडू वृत्ती दाखवली आणि पंचांकडे विकेटसाठी अपील केली नाही. स्मिथच्या या निर्णयासाठी त्याचे सर्वत्र कौतुक झाले होते. गांगुलीला या डावात जीवनदान मिळाले असले तरी, तौ वैयक्तिक 46 धावा करून बाद झाला. संघासाठी ही डावातील दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. पण संघ सामना जिंकू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात 5 विकेट्स राखून विजय मिळवला आणि मालिका देखील नावावर केली. ग्रॅमी स्मिथ याने केलेल्या 94 आणि 55 धावांच्या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. (In 2007, Sourav Ganguly was going to lose his wicket by time out rule. But Graeme Smith did not appeal against him, so he was given life)

महत्वाच्या बातम्या – 
रियान परागला भेटणार टीम इंडियात संधी? ‘या’ दिवशी करणार आंतरराष्ट्रीय पदार्पण
Timed Out । शाकिबनेच दाखवला स्वार्थीपणा! दिग्गजाने सांगितला मैदानात घडला प्रकार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---