---Advertisement---

धक्कादायक! ‘रनआऊट’मुळे झाला इतका मोठा बाद की खेळाडूच्या वडिलांना हाणामारीत गमवावा लागला जीव

On: रविवार, ऑगस्ट 8, 2021 3:24 PM
---Advertisement---

क्रिकेट हा खेळ भारतभरात सर्वत्र खेळलेला दिसून येतो. त्यामुळे हा खेळ खेळताना अनेक वेगवेगळ्या घटना घडत असतात. नुकतेच बिहारमधील अशाच एका क्रिकेट सामन्यामुळे एक मोठा वाद झाला आहे. धक्कादायक गोष्ट अशी की हा वाद इतका वाढला की एका व्यक्तीची हत्या करण्यात झाली आहे.

धावबादवरून दोन्ही संघात वादविवाद झाले, त्यात एका खेळाडूला बेदम मारहाण झाली. खेळाडूला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी धाव घेतली तेव्हा त्याच्या वडिलांनाही बेदम मारहाण झाली यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात घडली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव प्रल्हाद मंडल सांगण्यात येत आहे, तर त्याचा मुलगा नकुल मंडल सामना खेळत होता.

झिरो माइल पोलीस स्टेशनचे एसएचओ राजकुमार म्हणाले, “सामन्यादरम्यान नकुलची सूरज कुमार नावाच्या प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूशी शाब्दिक चकमक झाली. परिस्थिती अशा पातळीवर पोहचली की, नकुलला धावबाद झाल्यावर नकुलच्या भावाने सूरजला कानशिलात मारली. नकुलचे वडील प्रल्हाद मंडळ यांनी हस्तक्षेप करून समस्या सोडवली. यानंतर सूरजसह प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू घरी गेले.”

“काही तासांनंतर सूरज त्याचे मित्र अमर, अजय, दीपक आणि इतरांसह अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर पोहोचले आणि नकुल आणि त्याच्या भावाला थांबवले. त्यांनी नकुल आणि त्याच्या भावाला बेदम मारहाण केली. त्यांचे वडील त्यांच्या मदतीला आले, तेव्हा हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण केली. जोवर ते जमिनीवर बेशुद्ध पडत नाही, तोवर ते क्रिकेट बॅट, बेसबॉल बॅट, काठ्यानी त्यांना मारहाण करत राहिले”.

मृत प्रल्हादचा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात चहाचा स्टॉल असल्याने, त्यांचे दोन्ही मुले सामन्यानंतर तिथेच थांबले होते. हल्लेखोरांनी त्यांना तिथेच पकडले आणि मारहाण केली. राजकुमार म्हणाले, “आम्ही सूरज आणि इतर आरोपींविरोधात आयपीसी कलम अन्वये खुनाचा प्रयत्न आणि खुन आरोप दाखल केला आहे. त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”

महत्त्वाच्या बातम्या – 

‘गोल्डन डक’ ची जखम अजूनही ताजी, आता कोहली घेणार भारताच्या विजयाची जबाबदारी! दिले संकेत

सावध व्हा! ‘हा’ ऑस्ट्रेलियन खेळाडू गाजवणार टी-२० विश्वचषक स्पर्धा, कामगिरी पाहून फुटेल घाम

वडिलांना शेतीच्या कामात मदत करणाऱ्या नीरजने देशाला मिळवून दिले सुवर्णपदक; जाणून घ्या त्याच्याबद्दल खास गोष्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---