क्रिकेट हा असा खेळ आहे, जिथे कधीही काहीही होऊ शकते. काही वेळेस अशा गोष्टी घडतात जे खेळाडूंच्या हातात नसतात. यामुळे झालेल्या चुकीमुळे कधीकधी खेळाडू आपल्या रागावर ताबा ठेवू शकत नाही आणि राग व्यक्त करत असतात. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत राहतात. कधी एखाद्या गोलंदाजा विरुद्ध कोणी जास्त धावा केल्यास किंवा एखादा फलंदाज कमी धावा करून लवकर बाद झाल्यास राग अनावर होतो. असेच काहीसे सध्या सुरू असलेल्या या कॅरिबियन प्रीमियर लीगच्या (सीपीएल) एका सामन्यात घडले.
हा सामना सेंट किट्स अँड नेविस पॅट्रीयोट्स विरुद्ध सेंट लुसिया किंग्स संघात होता. यातील सेंट किट्स संघाचा फलंदाज शेरफेन रदरफोर्ड धावबाद झाल्यामुळे आपला राग रोखू शकला नाही. रागात त्याने त्याच्या जवळ असलेल्या क्रिकेटच्या वस्तू जोरात फेकल्या.
रदरफोर्ड १४ धावांवर फलंदाजी करत होता. धाव घेताना त्याचा आपल्या जोडीदारासोबत ताळमेळ बसला नाही. यामुळे तो धावबाद झाला. यामुळे डगआउटमध्ये जाताना रदरफोर्डने रागात त्याची बॅट, हेल्मेट आणि ग्लोज जोरात फेकले. यादरम्यान त्याने हेल्मेट देखील त्याने खूप जोरात फेकले.
डावातील १० व्या षटकात रुदरफोर्डला २ धावा हव्या होत्या. मात्र त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्या जोडीदार फलंदाजाला एकच धाव हवी होती. ज्यामुळे रदरफोर्ड नॉन स्ट्रायकरवर असताना धावबाद झाला. अशा पद्धतीने बाद झाल्यामुळे रदरफोर्ड आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकला नाही. आणि त्याने त्याच्या जवळ असलेले क्रिकेटचे वस्तू जोरात फेकून दिल्या.
Give that man an #angosturachill 😬#SKNPvSLK #CPL21 #CricketPlayedLouder #BiggestPartyInSport pic.twitter.com/Q9ZHoKs5Ek
— CPL T20 (@CPL) September 5, 2021
नाणेफेक जिंकून सेंट किट्स या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये त्यांनी पूर्ण २० षटके देखील खेळले नाही. सेंट किट्सचा संघ १९.३ षटकातच गारद झाला. तेव्हा संघाने केवळ ११८ धावा केल्या होत्या. त्यांच्या संघाकडून सर्वाधिक ३४ धावा फॅबियान ॲलनने केल्या. तर डेवॉन थॉमसने २८ धावा केल्या. यासह सेंट किट्स या संघाने सेंट लुसिया संघासमोर ११९ धावांचे आव्हान ठेवले होते.
त्यानंतर सेंट लुसिया किंग्सच्या संघाने हे लक्ष्य केवळ १५.४ षटकातच पूर्ण केले. लुसिया किंग्सने ४ विकेटच्या बदल्यात १२१ धावा करत शानदार विजय मिळवला. यामध्ये रोस्टन चेजने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. यानंतर संघाचा कर्णधार फॅफ डू प्लेसेसने देखील २२ धावा केला.
महत्वाच्या बातम्या –
–हलक्यात घेऊ नका, शास्त्रींचा कोरोना भारतीय खेळाडूंच्या मुलांसाठी धोकादायक; माजी क्रिकेटर चिंतीत
–मोठी बातमी! रवी शास्त्रींपाठोपाठ टीम इंडियाचे ‘हे’ महत्त्वाचे सदस्य देखील कोरोना पॉझिटिव्ह
–फॉर्मात परतण्यासाठी सेहवागचा रहाणेला रामबाण उपाय; म्हणाला, ‘आई-वडिलांसाठी मैदानावर…’