सध्या कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) सुरू आहे. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली ही स्पर्धा देखील क्रिकेट जगतात खूप लोकप्रिय आहे. या स्पर्धेत अनेक कॅरेबियन खेळाडू आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करत असतात. अर्थातच जिथे कॅरेबियन खेळाडू असतात, तिथे काहीतरी मजेशीर घटना घडत असतेच. अशीच एक घटना सीपीएलच्या एका सामन्यादरम्यान घडली.
सीपीएलच्या ८ व्या सामन्यात गयाना ॲमेझॉन वॉरियर्स विरुद्ध सेंट किट्स अँड पेट्रीयट्स असे दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळत होते. या सामन्यादरम्यान १३ व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेला ड्वेन ब्रावो गोलंदाजी केल्यानंतर खाली पडला. ज्यानंतर फलंदाजी करत असलेला शिमरन हेटमायर धाव घेत असताना, खेळपट्टीच्यामध्ये पोहोचल्यावर त्याने ब्रावोवर आपली बॅट उगारली.
सुरुवातीला ही घटना पाहून चाहते आश्चर्य झाले होते, मात्र संपूर्ण घटना समोर आल्यावर चाहत्यांनीदेखील याचा भरपूर आनंद घेतला. झाले असे की, धाव घेत असताना हेटमायरने चेष्टा करत ब्रावोवर आपली बॅट उगारली होती. मात्र, नंतर हेटमायर आणि त्याचा सोबती फलंदाज मोहम्मद हफिजने ब्रावोला अलिंगण देखील दिले, आणि मैदानातून उठण्यासाठी त्याची मदत देखील केली. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
The Spirit Of Cricket is the winner of the @fun88eng magic moment from match 8. #CPL21 #SKNPvGAW #CricketPlayedLouder #FUN88 pic.twitter.com/TqEhNI69pb
— CPL T20 (@CPL) August 29, 2021
हेटमायर आणि हाफिस यांच्या या मजेशीर अंदाजासाठी चाहत्यांनी त्यांच्या या कृतीवर भरपूर मजा घेतली. अनेक चाहत्यांकडून त्यांच्या या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच या व्हिडिओवर भरपूर कमेंट्स देखील आलेल्या आहेत.
दरम्यान, गयाना संघाने ३ विकेटच्या बदल्यात १६६ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये हफिसने शानदार अर्धशतकी खेळी करत ७० धावा केल्या होत्या. नंतर या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या पेट्रीयट्स संघाने शेफरन रूदरफोर्डच्या नाबाद ५९ खेळीच्या जोरावर ६ गडी राखून सामना जिंकला होता.
महत्वाच्या बातम्या –
–फॅमिली टाईम! यूएईमध्ये धोनी करतोय लाडक्या लेकीबरोबर धमाल मस्ती, व्हिडिओ तुफान व्हायरल
–‘या’ खेळाडूंनी बाकावर बसून घालवला इंग्लंड दौरा, आगामी सामन्यांमध्येही संधी मिळणे कठीण
–वॉशिंग्टन सुंदरची दुखापत ‘या’ खेळाडूसाठी ठरू शकते वरदान; टी२० विश्वचषकासाठी होऊ शकते निवड