अहमदाबादमध्ये दमदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आता मालिकेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजशी भिडणार आहे (Test series IND vs WI). हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाज आणि गोलंदाज या दोघांचाही खेळ अफलातून होता. मोहम्मद सिराजने (Mohmmed Siraj) चेंडूनं कैरेबियन फलंदाजांचा धुव्वा उडवला आणि तब्बल 7 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर जडेजा (Ravindra Jadeja and Kuldeep yadav) आणि कुलदीप यादव यांच्या फिरकी जोडीची जादूही जबरदस्त रंगली. फलंदाजीत जडेजा, ध्रुव जुरैल आणि के. एल. राहुल यांनी शतकं खेळी केली होती.
दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर साधारणपणे सुरुवातीला फलंदाजांची चांगली कामगिरी दिसून येते. मात्र, दोन-तीन दिवसांनंतर खेळपट्टी खराब होऊ लागते आणि मग फिरकीपटूंना खेळणं सोपं राहत नाही. चेंडू थोडा थांबून बॅटवर येतो. चौथ्या डावात धावांचा पाठलाग करणं खूप कठीण मानलं जातं. म्हणजे एकंदर पाहता या मैदानावर बॅट आणि बॉलमध्ये तगडी झुंज पाहायला मिळते. शिवाय या मैदानाच्या बाउंड्रीही तुलनेने लहान आहेत.
आजपर्यंत या स्टेडियमवर 37 कसोटी सामने झाले आहेत. त्यापैकी 6 वेळा पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे, तर 14 वेळा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे. या मैदानावर पहिल्या डावात सरासरी स्कोर 340, दुसऱ्या डावात 315, तिसऱ्या डावात 233 आणि चौथ्या डावात फक्त 163 एवढा आहे. याच मैदानावर वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध 8 बाद 644 धावा केल्या होत्या, जो आजवरचा सर्वोच्च डाव आहे.
पहिल्या कसोटीत भारताने कमाल केली होती. वेस्ट इंडिजला पहिल्या डावात केवळ 162 धावांवर गुंडाळल्यानंतर भारतीय फलंदाजांनी 448 धावा फलकावर लावल्या. दुसऱ्या डावातही कॅरिबियन फलंदाज काही करू शकले नाहीत आणि संपूर्ण संघ 146 धावांवरच बाद झाला.






