काही दिवसांपासून भारताच्या अनेक राज्यात पावसाळा सुरु झाला आहे. लोक पावसाळ्याचा आनंद घेत आहेत , काही लोक घरून चहा आणि भाज्यांसोबत पावसाचा आनंद घेत आहे. पण पावसामुळे क्रिकेट चाहत्यांना क्रिकेट पासून दूर व्हावे लागते, परंतु क्रिकेटची ही ओढ चाहत्यांना पावसामुळे क्रिकेट खेळण्यापासून थांबवू शकत नाही. आपल्याला अनेकदा मुले पावसात खेळतानाचे दृश्य दिसून येतात. अशाच एका घटनेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे, त्यात क्रिकेट प्रेमी पावसात क्रिकेट खेळतानाचा आनंद घेताना दिसून येत आहे. परंतु, यादरम्यान एका क्रिकेटप्रेमीसोबत अशी घटना घडली, जी पाहून तुमच्या सर्वांचे हसू थांबणार नाही.
वायरल होणारा हा व्हिडिओ एका ट्विटरवर वापरकर्त्याने शेयर केला आहे. त्याने व्हिडिओला ‘हेलिकॉप्टर शॉट’, असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की हा खेळाडू जोरदार पाऊसात क्रिकेट खेळत आहे आणि त्याने पूर्ण उत्साहात बॅट फिरवून हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केले आहे, परंतु त्याच्या बॅट मारण्याची गती एवढी होती ज्यामुळे तो स्वतःच जमिनीवर पडला आहे. हा व्हिडिओ बघताना सर्वे क्रिकेट चाहते आपले हसणे थांबवू शकले नाही.
Helicopter shot….🤣 pic.twitter.com/KvYPnUjaeB
— 🪯KulwantSingh ਲੰਬੜਦਾਰ 🇮🇳 (@KulwantJanjue) June 15, 2021
अनेक चाहत्यांनी त्या व्हिडिओला पसंती दिली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत तब्बल २१ हजार लोकांनी बघितले आहे. व्हिडिओ खाली चाहत्यांनी कंमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे.
महत्वाच्या बातम्या
मेहनतीला पर्याय नाही! WTC च्या अंतिम सामन्यापूर्वी आर अश्विन करतोय कसून सराव, व्हिडिओ व्हायरल
अमेरिका संधीचे प्रवेशद्वार! स्मित पटेलनंतर ‘हा’ खेळाडूही दिसणार अमेरिकेत क्रिकेट खेळताना
लईच भारी! साउथम्प्टनमध्ये दाखल झाल्यानंतर न्यूझीलंड संघाने केली पार्टी, वॅग्नर बनला शेफ