आशिया चषक 2023चा सामना पूर्णपणे एकतर्फी होताना दिसला. मोहम्मद सिराज याने एकट्याच्या जोरावरावर श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत पाठववा. पावरप्लेच्या 10 षटकांमध्ये श्रीलंकेची धावसंख्या 6 बाद 31 धावा होती. यातील पाच विकेट्स एकट्या सिराजने घेतल्या. संघाला अप्रतिम सुरुवात दिल्यानंतर रविवारी (17 सप्टेंबर) सिराजच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला आहे.
मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आता भारतासाठी वनडे सामन्यात पहिल्या 10 षटकांमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारा गोलंदाज ठरला आहे. पूर्वी हा विक्रम माजी दिग्गज जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) यांच्या नावावर होता. वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी पावरप्लेच्या 10 षटकांमध्ये सर्वाधिक 5 विकेट्स सिराजने घेतल्या आहेत. जवागल श्रीनाथ यांनी पारप्लेच्या 10 षटकांमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या, यापूर्वीचे सर्वोत्तम प्रदर्शन होते. यादीत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांची नावे आहेत. या दोघांनी देखील प्रत्येकी चार-चार विकेट्स पहिल्या 10 षटकात मिळवल्या होत्या.
वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या 10 षटकात सर्वोत्तम प्रदर्शन करणारे भारतीय गोलंदाज
5 – मोहम्मद सिराज विरुद्ध श्रीलंका (कोलंबो, 2023)
4 – जवागल श्रीनाथ विरुद्ध श्रीलंका (जोहान्सबर्ग, 2003)
4 – भुवनेश्वर कुमार विरुद्ध श्रीलंका (पोर्ट ऑफ स्पेन, 2013)
4 – जसप्रीत बुमराह विरुद्ध इंग्लंड (द ओव्हल, 2022)
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतीय संघाने श्रीलंकेला अवघ्या 50 धावांवर सर्वबाद केले. जयमान श्रीलंका संघ अवघ्या 15.2 षटकांपर्यंत खेळपट्टीवर ठिकू शकला. मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. यासाठी त्याला 7 षटके गोलंदाजी करावी लागली आणि 21 धावा वेगवान गोलंदाजाने खर्च केल्या. अष्टपैलू हार्दिक पंड्या याने 2.2 षटकात 3 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या. भारताला विजयासाठी 50 शटकांमध्ये 51 धावा हव्या आहेत. (In ODI cricket, the best performance in Powerplay went to Mohammad Siraj)
आशिया चषक 2023च्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
श्रीलंका – पथुम निसांका, कुशल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दसून शनाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पथिराना.