इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (शनिवारी, १४ ऑगस्ट) इंग्लंड संघाने संपूर्ण दिवसभर धीरोदात्तपणे फलंदाजी करत सामन्यात पुनरागमन केले. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने शानदार शतकी खेळी करत इंग्लंडच्या फलंदाजीचे नेतृत्व केले. या खेळीत दरम्यान त्याने अनेक नवे विक्रम आपल्या नावे केले.
रूटचे झुंजार शतक
दुसऱ्या दिवशी नाबाद असलेल्या रूटने तिसऱ्या दिवशी आपला अप्रतिम खेळ कायम ठेवला. त्याने प्रथम जॉनी बेअरस्टोसोबत शतकी भागीदारी केली. यादरम्यान त्याने आपले २२ वे व भारताविरुद्धचे सातवे कसोटी शतक पूर्ण केले. इंग्लंडचा अखेरचा फलंदाज जेम्स अँडरसन दिवसातील शेवटच्या चेंडूवर बाद झाल्याने रूट १८० धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडने त्याच्या खेळीच्या जोरावर ३९१ धावा बनवून २७ धावांची आघाडी घेतली.
पहिल्यांदाच केली अशी कामगिरी
जो रूटने मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात शतक पूर्ण केले. रूटने आपल्या कारकीर्दीत प्रथमच सलग दोन डावांमध्ये शतके झळकावली आहेत. रूटने नॉटिंघम कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावलेले. त्यानंतर आता लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही शतक पूर्ण केले. त्याच्यापूर्वी अशी कामगिरी करणारा इंग्लंडचा अखेरचा फलंदाज इयान बेल हा होता. त्याने २०१३ ऍशेस मालिकेत सलग दोन शतके झळकावलेली.
एकाच खेळीत रूटचे अनेक विक्रम
जो रूटने या खेळी दरम्यान अनेक नवे विक्रम आपल्या नावावर केले. रूट इंग्लंडसाठी २२ शतके ठोकणारा पाचवा फलंदाज बनला. त्याने या खेळी दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा पार केला. एकाच कॅलेंडर वर्षात पाच शतके ठोकणारा तो पहिला इंग्लिश खेळाडू बनला. तसेच सर्वात कमी वयात ९ हजार कसोटी धावा बनवणारा तो दुसरा फलंदाज ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
लाजवाब रूट! भारताविरुद्ध शानदार दीडशतकी खेळीसह कूकपाठोपाठ ‘त्या’ यादीत मिळवला दुसरा क्रमांक
रहाणे आणि पुजारा यांना संघातून काढून टाकण्याच्या मागणीवर केएल राहुलने केले “असे” भाष्य