टी20 विश्वचषक सुरू होण्याधीच भारतीय पुरूष क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजांची चिंता सतावत असताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टी20 विश्वचषकातून (T20 World Cup)बाहेर झाला आहे. सध्यातरी या वृत्तेबाबत अधिकृत माहिती बीसीसीआयने दिलेली नाही. पीटीआयच्या रिपोर्ट्सनुसार त्याला खेळणे अशक्य असल्याने त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. अशा स्थितीत भारताकडे कोणते वेगवान गोलंदाज आहेत जे बुमराहची जागा घेऊ शकतील.
आशिया चषक 2022नंतर भारताच्या डेथ ओव्हर्सच्या चिंतेते वाढ झाली आहे, मात्र नंतर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघात परतला. वाटले सगळे ठिक होईल, मात्र दुसऱ्या सामन्यात 2 षटके आणि शेवटच्या सामन्यात 4 षटके टाकताना तो लयीत दिसला नाही. त्यालाही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धुतले. 4 षटकात त्याने 50 धावा दिल्या, ज्या त्याच्या टी20मधील सर्वाधिक धावा ठरल्या. तसेच तो तिरूअनंतपुरम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातही खेळला नाही. त्याला पाठीचा त्रास जाणवू लागल्याने तो पहिल्या सामन्यात खेळणार नाही, असे ट्वीट बीसीसीआयने केले होते.
बुमराहच्या टी20 विश्वचषकातून बाहेर पडण्याने मोहम्मद शमी, दीपक चाहर आणि मोहम्मद सिराज यांच्या नावाची चर्चा होत आहे. शमी आणि चाहर हे भारताच्या टी20 विश्वचषकासाठीच्या राखीव खेळाडूंमध्ये आहेत, तर सिराजचे नाव कुठेही नसल्याने त्याच्याबाबत असंभ्रमता आहे. यामुळे शमी आणि चाहर यांची बुमराहच्या अनुपस्थितीत मुख्य संघात वर्णी लागेल, तर सिराज हा इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहे. भारतासाठी आनंदाची बातमी म्हणजे शमीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कोरोनामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात खेळला नाही. तर या मालिकेतील दुसरा सामना 2 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे.
डेथ ओव्हर्समधील वाईट कामगिरीमुळे भारत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला नाही. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात 208 धावसंख्येचा बचाव करण्यास अपयशी ठरला होता. भुवनेश्वर कुमार याचीही डेथ ओव्हर्समधील गोलंदाजी काळजीचे कारण बनली आहे, तर बुहराहच्या अनुपस्थितीत अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल यांच्यावर महत्वाची जबाबदारी असणार आहे. हे दोघेही टी20 विश्वचषकाच्या भारताच्या मुख्य संघात आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ठरलं तर! 7 ऑक्टोबरला पुन्हा भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच, जाणून घ्या कुठे आणि कधी खेळणार संघ
बिग ब्रेकिंग! भारताला मोठा धक्का, मुख्य वेगवान गोलंदाज टी20 विश्वचषकातून ‘आऊट’
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केएल राहुलची स्लो खेळी ठरली ऐतिहासिक, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला एकमेव भारतीय






