इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पण आगामी आयपीएल हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघ अद्याप तयार नसल्याचे दिसते. कारण त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आगामी आयपीएल हंगामात खेळणार नसल्याचे सांगितले जात आहे. असात संघाला एका नवीन कर्णदाराची आवश्यकता आहे.
नियमित कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आगामी हंगामात खेळला नाही, तर संघाला त्याच्या बदली खेळाडूच्या रूपात संघात नवीन खेळाडूला संधी द्यावी लागणार आहे. सोबतच त्याचा कमी भरून काढण्यासाठी त्या दर्जाचा कर्णधार देखील संघाला हवा आहे. केकेआरने आयपीएल 2022 पूर्वी मेगा लिलावात श्रेयसला खरेदी करण्यासाठी 12.25 कोटी रुपये खर्च केले होते. पण आता हा स्टार खेळाडू आगामी हंगामात खेळू शकणार नाहीये. श्रेयस ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग होता. पण अहमदाबादमध्ये खेळलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान त्याच्या पाठिला दुखापत झाली. या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी श्रेयसला अजून 2 किंवा 3 महिने लागू शकतात. आपण या लेखात तीन अशा खेळाडूंवर नजर टाकणार आहेत, जे आगामी आयपीएल हंगामात श्रेयस अय्यरच्या जागी केकेआरचे नेतृत्व करू शकतात.
1 – शाकिब अल हसन
जागतिक क्रिकेटमध्ये दिग्गज अष्टपैलूंच्या यादीच शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याचे नाव घेतले जाते. अशात बांगलादेशचा हा दिग्गज आगामी आयपीएल हंगामात केकेआरचे नेतृत्व करू शकतो. शाकिब अलह हसन याच्याकडे आंतरराष्ट्रीय तसेच फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्याचा मोठा अनुभव आहे.
2 – सुनील नारायण
आयपीएल 2012 साली केकेआरने सुनील नरेन (Sunil Narine) याला त्यांच्या संघात सामील केले. त्याच्याकडे फ्रँचायझी क्रिकेट खेळण्याचा मोठा अनुभव आहे आणि आगामी आयपीएल हंगामात केकेआरचे नेतृत्व तो चांगल्या प्रकारे करू शकतो. संघातील इतरांच्या तलनेत सुनीलकडे लीग क्रिकेटचा अनुभव नक्कीच अधिक आहे. केकेआरने जेव्हा दोन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली, तेव्हा सुनील नरेन संघाचा भाग होता. त्याने संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये योगदान दिले.
3 – शार्दुल ठाकूर
केकेआरकडून खेळम्याची शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) साठी ही पहिलीच वेळ आहे. पण एक भारतीय खेळाडू असल्यामुळे त्याला आगमी हंगामात केकेआरचे कर्णधारपद मिळू शकते. मागच्या हंगामात शार्दुल ठाकूर फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये काही खास कामगिरी करू शकला नाही. पण यावर्षी केकेआरसाठी तो चमकदार कामगिरी करू शकतो.
(In the absence of Shreyas Iyer, these three players are the main contenders for KKR’s captaincy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका वनडे मालिकेत बांगलादेशचे दोन विक्रमी विजय, 10 विकेट्सने जिंकली तिसरी वनडे
बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांचा भीमपराक्रम! वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच केली ‘अशी’ कामगिरी