आयपीएल 2023 चा 27वा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला जात आहे. गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या पंजाब किंग्जचे होम ग्राउंड मोहालीमध्ये हा सामना खेळला गेला. पाहुण्या आरसीबीला या सामन्यात विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी वेगवान सुरूवात मिळवून दिली. मात्र शेवटच्या षटकांमध्ये मध्यक्रमातील फलंदाज अपेक्षित खेली करू शकले नाहीत. आरसीबीचा दिग्गज यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने पुन्हा एकदा चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले.
पंजाब किंग्जचा नियमित कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) या सामन्यात अनुपस्थितीत होता. तर दुसरीकडे आरसीबीचे नेतृत्व बऱ्याच दिवसांनी विराट कोहली (Virat Kohli) करत होता. धवनच्या अनुपस्थितीत सॅम करन सलग दुसऱ्या सामन्यात पंजाबचे नेतृत्व करत असून त्याने नाणेफेक जिंकली आणि आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आणंत्रित केले. प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीने निर्धारित 20 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या नुकसानावर 174 धावा केल्या. मात्र, दिनेश कार्तिकचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले. कार्तिकने 5 चेंडूत अवघ्या 7 धावा केल्या आणि विकेट गमावली.
आरसीबीची धावसंख्या पहिल्या 10 षटकांमध्ये एकही विकेट गमावता 91 धावा होती. पण शेवटच्या 10 षटकांमध्ये संघाने चार विकेट्स गमावल्या आणि 85 धावा केल्या. शेवटच्या 10 षटकांमध्ये पंजाबच्या गोलंदाजांनी जबरदस्त पुनरागमन करत आरसीबीला मर्यादित धावसंख्येवर रोखले. हरप्रीत बरार याने पंजाबसाठी 31 धावा खर्च करून सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग आणि नाथन एलिस यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. आरसीबीसाठी डू प्लेसिसने सर्वाधिक 84, तर विराट कोहली यायने 59 धावांची खेळी केली.
कार्तिकने या सामन्यात केलेल्या प्रदर्शनानंतर त्याच्यावर टीका करणाऱ्यांची संख्याही वाढली. आयपीएल 2023मध्ये कार्तिकने आतापर्यंत 0, 9, 1*, 0, 28 आणि 7 असे प्रदर्शन केले आहे. ग्लेन मॅक्सवेलने मागच्या काही सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केले असले तरी, गुरुवारी तो गोल्डन डक झाला. महिपाल लोमरूर 7, तर शाहबाज अहमद 5 धावांवर नाबाद राहिले. (In the last 10 overs, the bowlers of Punjab Kings made a tremendous comeback. Dinesh Karthik failed again)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023 मध्ये ‘या’ संघांनी नवीन कर्णधार नेमून केली मोठी चूक! पाहा आकडेवारी
‘काय माहिती RCBने चहलला का रिलीज केलेलं’, इंग्लंडच्या दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न






