आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीकडून बुधवारी (17 जानेवारी) टी-20 खेळाडंची ताजी क्रमवारी जाहीर केली गेली. यात भारतीय संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याने मोठी झेप घेतल्याचे दिसते. जयस्वाल सात स्थानांची झेप घेत टॉप 10 फलंदाजांमध्ये पोहोचला आहे. तो सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टी-20 क्रमवारी देखील ठरली.
यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याच्याकडे सध्या 739 रेटिंग गुण आहेत आणि तो सहाव्या क्रमांकावर आहे. जयस्वालने नुकत्याच खेळल्या गेलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. त्याने 34 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 68 धावा केल्या. त्याने तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यातून माघार घेतली होती. भारतीय संघ या मालिकेत सद्या 2-0 अशा आघाडीवर आहे. पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम सध्या एका स्थानाने पुढे सरकला आहे. माजी पाकिस्तानी कर्णधाराने टी-20 फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांक गाठला असून त्याच्याकडे 763 गुण आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत बाबरने जबरदस्त फॉर्म दाखवला असून पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी केली. असे असले तरी, पाकिस्तान संघाला या तिन्ही सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला.
भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. सूर्यकुमारकडे सर्वाधिक 869 गुण असून तो पहिल्या क्रमांकावर आहे. तो दुखापतग्रस्त असल्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळत नाहीये. इंग्लंडचा फिल सॉल्ट (802) दुसऱ्या आणि पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान (763) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतीय संघाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड (661) सध्या नवव्या क्रमांकावर आहे.
तसेच गोलंदाजांच्या क्रमवारीचा विचार केला, तर भारताचा अष्टपैलू अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्याकडे एकूण 667 गुण आहेत. ही त्याच्या टी-20 कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी देखील ठरली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या दोन टी-20 सामन्यांमध्ये त्याने चार विकेट्स नावावर केल्या आहेत. याच प्रदर्शनचा लाभ त्याला टी-20 क्रमवारीत झाला. इंग्लंडचा आदिस राशिद (726) पहिल्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडीजचा अकिल हुसेन (683) दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा लेग स्पिनर रवि विश्नोई 666 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. बिश्नोईल अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात एकही विकेट मिळाली नव्हती. पण दुसऱ्या सामन्यात त्याने दोन खेळाडूंना पवेलियनची वाट दाखवली. (In the latest ICC rankings, Yashasvaj Jaiswal has taken a big leap in the list of T20 batsmen)
महत्वाच्या बातम्या –
Virat Kohli Records: कोहलीला विश्वविक्रम मोडण्याची संधी, अफगाणिस्तानविरुद्ध फक्त 6 धावांची गरज
भारताचा युवा खेळाडू भेटला आपल्या आयडाॅलला; दिग्गजाच्या पायापडून घेतला आशीर्वाद, पाहा व्हिडिओ