यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) सध्या सुपर 8 चे सामने खेळले जात आहे. आतापर्यंत एकूण 8 सुपर 8 चे सामने खेळले गेले आहेत. तत्पूर्वी भारतानं यंदाच्या विश्वचषकात विजयी रथ चालूच ठेवला आहे. शनिवारी (22 जून) रोजी भारत विरुद्ध बांग्लादेश खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं बाजी मारली. परंतु या सामन्यादरम्यान विराट कोहली (Virat Kohli) चेंडू काढण्यासाठी स्टेजच्या खाली घुसला. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
आयसीसीनं त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बांग्लादेशचा फलंदाज रिशाद हुसेन वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या चेंडूवर षटकार ठोकतो. चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर स्टेजच्या खाली जातो. त्यावेळी बाउँड्रीवर क्षेत्ररक्षण करत असलेला विराट कोहली चेंडू काढण्यासाठी त्या स्टेजच्या खाली घुसतो आणि चेंडू काढतो. कोहली स्टेजच्या खाली चेंडू काढण्यासाठी घुसलेला हा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) बांग्लादेशविरुद्ध उत्कृष्ट फलंदाजी केली आणि चाहत्यांनी त्याचा प्रचंड आनंद घेतला. कोहलीनं 28 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 37 धावा केल्या. सतत धावा काढण्यासाठी धडपडणाऱ्या कोहलीनं बांग्लादेशसोबत खेळल्या गेलेल्या सुपर 8 सामन्यात दमदार फलंदाजी केली. कोहली जेव्हा जेव्हा मैदानात येतो तेव्हा चाहत्यांचं चांगलंच मनोरंजन होतं. फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण, विराट कोहली नेहमी खेळाचा आनंद घेताना दिसतो.
भारतीय गोलंदाजांनी बांग्लादेशच्या फलंदाजांना डोकं वर काढू दिलं नाही. बांग्लादेशचा संघ भारतानं दिलेल्या 197 धावांचा पाठलाग करताना 8 गडी गमावून केवळ 146 धावाच करु शकला. भारतानं हा सामना 50 धावांनी जिंकला आणि सुपर 8 सामन्यात सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. बांग्लदेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांचं भारतीय ड्रेसिंग रूममध्ये जोरदार स्वागत! या खेळाडूनं जिंकलं सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं मेडल
अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार दुखावला, भारताला इशारा देत केलं मोठं वक्तव्य
ऑस्ट्रेलियावर विश्वचषकातून बाहेर पडण्याचा धोका, अफगाणिस्तानकडे सेमीफायनलमध्ये धडक मारण्याची संधी!