क्रिकेटविश्वाशी संबंधित रोज नवनवीन बातम्या माध्यांमधून समोर येत असतात. या बातम्यांपैकी सर्वच्या सर्व अगदी खऱ्याच असतील अशातला काही भाग नाही, कारण अनेकदा खेळाडूंविषयी चुकीच्या अफवा देखील पसरत असतात, ज्यावरून बातम्या बनवण्याचे काम ही माध्यमे करतात. असे असले तरी, खेळाडूंना मात्र या अफवा आणि बातम्यांमुळे रोज अनेकांना तोंड देण्याची वेळ येते. आशिया चषकासाठी यूएईत गेलेला भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने अशा अफवांच्या पार्श्वभूमीवर एक जबरदस्त उत्तर दिले, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
भारताला आशिया चषकातील दुसरा सामना बुधवारी (31 ऑगस्ट) हॉन्गकॉन्ग संघाविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) माध्यमांशी बोलत होता. त्यावेळी एका पत्रकाराने त्याला एक प्रश्न विचारला, ज्यामधून त्याला स्वतःविषयीची एक अफवा समजली. जडेजाने या पत्रकाराला त्याच्या खास शैलीत उत्तर दिले. चाहत्यांना हे उत्तर खूपच भावले आहे, आणि याविषयी चर्चा देखील होत आहे.
पत्रकारने विचारले की, “जडेजा सर्वात आधी तू तुझ्या यशाचे गुपित सांग. आयपीएल संपल्यानंतर आम्ही अफवा ऐकल्या की, जडेजा विश्वचषक (टी-20) स्पर्धेतून खेळणार नाहीये. तो मागच्या एक वर्षापासून दुखापग्रस्त आहे. त्यानंतर तू पुनरागमन केले आणि केवळ भारत-पाकिस्तन सामन्यात खेळलाच नाही, तर संघाला विजय देखील मिळवून दिला. जेव्हा तुझ्याविषयी एवढ्या सगळ्या चर्चा होत होत्या, तेव्हा तू दबावाचे कसे नियोजन केले? तू है सर्व ऐकून विचलित होतोस का?”
पत्रकाराच्या या मोठ्या प्रश्नावर उत्तर देताना जडेजा म्हणाला की, “तूम्ही तर खूप छोटी गोष्ट बोलला आहात की, मी विश्वचषक खेळणार नाही. मध्यंतरी अशी बातमी आली होती की, मी मेलो आहे. यापेक्षा मोठी बातमी तर असूच शकत नाही, पण मी याविषयी जास्त विचार करत नाही. जसे की म्हणालो, मला फक्त मैदानात उतरून चांगले प्रदर्शन करायचे आहे, इतर गोष्टींचा मी जास्त विचार करत नाही. मी कसून सराव करतो आणि माझ्यामध्ये सुधारही करतो. या गोष्टी प्रत्यक्षात सामना खेळताना मदतीच्या ठरतात. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण, फक्त याच गोष्टी मी दररोज करतो.”
दरम्यान, भारतीय संघाने आशिया चषकातील पहिला सामना रविवारी (28 ऑगस्ट) पाकिस्तानविरुद्ध खेळला. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला ५ विकेट्स राखून पराभूत केल्यानंतर भारताला आता सलग दुसऱ्या विजयाची अपेक्षा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अफगाणिस्तानच्या कुठल्याच खेळाडूला जमलं नाही ते राशिदने केलं, बनला टी-20 क्रिकेटमधला महान गोलंदाज
‘हाँगकाँगचा बाबर’ भारतासाठी ठरणार कर्दनकाळ! नावावर आहे मोठा विक्रम, रोहितही नाही आसपास
झादरान द फिनिशर! अफगाणी फलंदाजांचा चमत्कारिक सिक्स, पुल आणि स्कूपचे केले मिश्रण