भारत आणि इंग्लंड संघात 4 ऑगस्टपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. परंतु त्या अगोदर भारतीय संघ आणि काउंटी सिलेक्ट इलेव्हनमध्ये तीन दिवसीय सराव सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचे 2 खेळाडू भारताच्या संघाव्यतिरिक्त काउंटी सिलेक्ट इलेव्हनकडून सामने खेळत होते.
सिराजने केले सुंदरला स्लेज
काउंटी इलेव्हन संघाचा फलंदाज म्हणून वॉशिंग्टन सुंदर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास आला होता, तेव्हा भारतीय संघाकडून मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. वॉशिंग्टन सुंदर हा मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. एवढेच नव्हे, तर वॉशिंग्टन सुंदरला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजही स्लेजिंग करताना दिसून आला. (In the practice match, Mohammad Siraj dismissed Washington Sundar, the video came to the fore)
सिराजचे भान हरवले
या तीन दिवसीय सराव सामन्यात आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर काउंटी इलेव्हन संघाकडून खेळत होते. स्लेजिंग केल्यानंतर मोहम्मद सिराजने ही शॉर्ट बॉल फेकून वॉशिंग्टन सुंदरला बाद केले. वॉशिंग्टन सुंदरला 7 चेंडूत 1 धावा करता आल्या, तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या व्हिडिओला चाहते मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवत आहेत.
.@mdsirajofficial ????
He gets @BCCI team-mate Sundar ????
Live stream ➡️ https://t.co/KWauz1AJvx#CountyXIvIndia pic.twitter.com/nGHB89gvT4
— Durham Cricket (@DurhamCricket) July 21, 2021
चाहत्यांनी केल्या कमेंट
हा व्हिडिओ पाहून एका चाहत्याने प्रतिक्रिया दिली की, ‘असे चार महिन्यातून दुसऱ्यांदा झालेले की मोहम्मद सिराजने वॉशिंग्टन सुंदरला धावा बनवण्यापासून थांबविले आहेत.’ आणखी एका चाहत्याने प्रतिक्रिया दिली की, ‘दोस्त दोस्त ना रहा,’ म्हणजेच मित्र-मित्र नाही राहिले.
Mohammad Siraj exchanged a few words to Washington Sundar. pic.twitter.com/xC5EPuZeZI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 21, 2021
केएल राहुलने केल्या 101 धावा
या सराव सामन्यांचे कर्णधारपद रोहित शर्माला देण्यात आले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या पहिल्या डावात के एल राहुल पुणे 101 धावा केल्या तर रवींद्र जडेजाने 75 धावा करत संघाला 311 धावांपर्यंत पोहोचविले.
तरी या सराव सामन्याच्या दरम्यान कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला विश्रांती देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-केएल राहुलच्या ‘त्या’ कृतीतून दिसले देशप्रेम, चाहत्यांनी केले कौतुक, पाहा व्हिडिओ






