भारत आणि श्रीलंका (IND vs SL, T20 series) यांच्यातील भारतात खेळवली जाणारी टी-२० मालिका गुरुवारी (२४ फेब्रुवारी) सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना लखनऊ तर शेवटचे दोन सामने धरमशालामध्ये खेळले जातील. भारतीय संघातील विराट कोहली, रिषभ पंत, शार्दुल ठाकुर यांना या मालिकेसाठी विश्रांती दिली गेली आहेत, तर काही खेळाडू दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने पत्रकार परिषदेत यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याच्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकार परिषदेत रोहितने भारताच्या युवा खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत राहण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामुळे भविष्यात त्यांना आपोआप भारतीय संघात संधी मिळू शकते. त्याच्या मते हनुमा विहारी, श्रेयस अय्यर आणि शुबमन गिली यांनाही अशाच प्रकारे संधी मिळाली होती.
तसेच यावर्षी खेळला जाणारा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणार आहेत. या विश्वचषक स्पर्धेत संजू सॅमसनला संधी मिळण्याविषयी रोहित शर्माकडून संकेत मिळाले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला संधी दिली गेली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या मते सॅमसन एक गुणवंत फलंदाज आहे.
रोहित म्हणाला, त्याला आपण आयपीएलमध्ये विस्फोटक फलंदाजी करताना पाहिले आहे. तो आयपीएलमध्ये जेव्हा कधी फलंदाजी करतो, तेव्हा जबरदस्त खेळी करतो. त्याच्याकडे पुढे जाण्याची पूर्ण योग्यता आहे.
रोहित शर्मा म्हणाला, “सॅमसन बॅकफुटवर जबरदस्त शॉट खेळतो. त्याव्यतिरिक्त त्याचा पुल आणि कट शॉटही अप्रतिम आहे. तो गोलंदाजांच्या वरून जबरदस्त शॉट खेळतो. आम्ही यावर्षी जेव्हा टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियामध्ये जाऊ, तेव्हा असे शॉट खेळणाऱ्या फलंदाजाची गरज असेल. सॅमसनमध्ये ही गुणवत्ता दिसते. मला अपेक्षा आहे की, त्याला मिळालेल्या संधीचा तो फायदा घेण्याचा प्रयत्न करेल.” रोहित शर्माच्या मते वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही खेळण्यासाठी फिट आहेत.
श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यासाठी निवडल्या जाणाऱ्या प्लेइंग इलेव्हनविषयी रोहित म्हणाला, “संघाचा निर्णय खेळपट्टी, विरोधी संघ आणि अनेक मुद्ये पाहून घेतला जातो. आम्हाला टी-२० मालिकेनंतर सलग तीन कसोटी खेळायच्या आहेत. श्रीलंकेविरुद्ध दोन आणि इंग्लंडविरुद्ध एक खेळायची आहे. त्यावरही आमचे पूर्ण लक्ष असेल. दोन कसोटी सामन्यांसाठी तर संघाची घोषणा झालेली आहे, तर इंग्लंड दौऱ्यासाठी नंतर निर्णय घेतला जाईल.”
महत्वाच्या बातम्या –
आठवतंय का? १२ वर्षांपूर्वी ३६ वर्षांच्या सचिन तेंडूलकरने क्रिकेटमध्ये घडवला होता इतिहास