मुंबईकर सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ ने रणजी ट्रॉफी २०२३-२४ मध्ये छत्तीसगडविरुद्ध दुसरा सामना खेळत असताना त्याने बंगालविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याच्या एका डावात ३५ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर छत्तीसगड विरुद्धच्या पहिल्याच डावात त्याने दमदार फलंदाजी करत शतक ठोकले आहे. तसेच रणजी मोसमातील पृथ्वी शॉ चे हे पहिले शतक असून त्याने अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत अखेर क्रिकेटच्या मैदानात तो लयीत परतला आहे.
याबरोबरच, 24 वर्षीय पृथ्वी शॉने शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर रणजी ट्रॉफी 2024 अंतर्गत खेळल्या जात असलेल्या मुंबई विरुद्ध छत्तीसगड सामन्यात 102 चेंडूत शतक पूर्ण केले आहे. यामध्ये त्याने 13 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. तर पृथ्वीचे हे 80 डावातील 13 वे प्रथम श्रेणी शतक आहे.तर, गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत असताना पृथ्वी शॉला रॉयल लंडन वन डे चषकात नॉर्थम्प्टनशायरविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती.
यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया आणि पुनर्वसन करावे लागले होते. तसेच त्यांनी एनसीएमध्ये पुनर्वसनात भाग देखाल घेतला होता. तर, पृथ्वी शॉ काही काळ दुखापतीशी झुंजत होता आणि त्यामुळे सय्यद मुश्ताक अली टूर्नामेंट, विजय हजारे ट्रॉफी आणि या रणजी मोसमाच्या पूर्वार्धात मुंबईचे प्रतिनिधित्व करणे त्याला शक्य झाले नव्हते. पण स्पर्धेच्या उत्तरार्धात या शतकासह त्याने शानदार पुनरागमन केले. पृथ्वी शॉ च्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील हे १३वे शतक होते, जे ८०व्या डावात आले आहे.
पृथ्वी शॉ बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. डिसेंबर २०२०मध्ये अडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला. ODI बद्दल बोलायचे झाले तर, त्याने भारतासाठी शेवटचा सामना २३ जुलै २०२१ रोजी श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे खेळला होता.
दरम्यान, पृथ्वीने भारतासाठी आतापर्यंत ५ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने शतकाच्या मदतीने ३३९ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या १३४ धावा आहे. ६ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने १८९ धावा केल्या आहेत आणि सर्वोत्तम धावसंख्या ४९ धावा आहे.
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG : तिसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडला मिळाला थेट इशारा; ऐव्हढे फास्ट क्रिकेट खेळूनही…
IND vs ENG : बुमराह आणि अँडरसन यांच्यातील क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज कोण? जाणून व्हाल थक्क…