---Advertisement---

दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड सामन्यात पावसाने हजेरी लावल्यास, रिझर्व्ह डे असणार का नाही?

On: बुधवार, मार्च 5, 2025 5:01 PM
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा भारत पहिला संघ ठरला आहे. आता (5 मार्च) रोजी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळला जात आहे. दुबईमध्ये झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान खराब हवामानाची समस्या नव्हती.

पाकिस्तानमध्ये झालेल्या 4 सामन्यांमध्ये पाऊस पडला. जर उपांत्य सामन्यादरम्यान पाऊस पडला तर सामना रद्द होईल का? पावसाच्या बाबतीत उपांत्य सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आला आहे का.

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वी हे राखीव दिवस निश्चित करण्यात आले होते. भारत-ऑस्ट्रेलिया सामना 4 मार्च रोजी खेळवण्यात आला. सामना विस्कळीत झाल्यास पहिल्या उपांत्य फेरीसाठी 5 मार्च हा राखीव दिवस म्हणून निश्चित करण्यात आला होता. 5 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यासाठी 6 मार्च हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला होता. नॉकआउट सामन्यांमध्ये निकाल लावण्यासाठी सामन्याचा निश्चित वेळ वाढवण्याचीही तरतूद आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई येथे खेळला जाईल. भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचल्याने हायब्रिड मॉडेल अंतर्गत अंतिम सामन्याचे ठिकाण लाहोरहून दुबई येथे बदलण्यात आले आहे. जर कोणत्याही परिस्थितीत 9 मार्च रोजी अंतिम सामन्याचा निकाल शक्य झाला नाही, तर विजेतेपदाचा सामना राखीव दिवशी म्हणजेच 10 मार्च रोजी खेळवला जाईल.

2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही असेच काहीसे घडले होते. त्यावेळी अंतिम सामन्याच्या दिवशी आणि राखीव दिवसाच्या दिवशी पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. अशा प्रकारे भारत आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले.

 

महत्वाच्या बातम्या : 

सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय, पाकिस्तानला मोठा फटका बसण्याची शक्यता!

वरुण चक्रवर्तीचा आयसीसी रँकिंगमध्ये दणदणीत प्रवेश, 143 स्थानांची झेप घेत थेट या स्थानावर!

सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून श्रेयस अय्यरचा सन्मान, ड्रेसिंग रूममध्ये रवी शास्त्रींनी दिले पदक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---