ऑस्ट्रेलिया दौऱ्यात इंग्लंड संघाचा चांगलीच निराशा झाली आहे. मालिकेतील पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने मोठ्या फरकाने जिंकले होते. मंगळवारी (22 नोव्हेंबर) मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मेलबर्नमध्ये पार पडला, डेविड वॉर्नर आणि ट्रेविस हेड यांनी या सामन्यात शतकीय योगदान दिले. ऑस्ट्रेलियाने हा सामना 221 धावांच्या मोठ्या अंतराने जिंकला आणि विजयात वॉर्नर आणि हेडचे योगदान सर्वात मोठे राहिले.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाने 48 शटकांमध्ये 5 विकेट्सच्या नुकसानावर 355 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ 31.4 षटकांमध्ये 142 धावा करून सर्वबाद झाला. परिणामी इंग्लंड विजयापासून तब्बल 221 धावा दूर राहिला. ऑस्ट्रेलियन फलंदाज चांगले प्रदर्शन करताना दिसलेच, पण गोलंदाजी विभागचे प्रदर्शन देखील कौतुकास पात्र ठरले. तिसरा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडला या मालिकेत क्लीन स्वीप (3-0) मिळाला. डेविड वॉर्नर मालिकावीर, तर ट्रेविस हेड तिसऱ्या सामन्यात सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला डेविड वॉर्नर (David Warner) आणि ट्रेविस हेड (Travis Head) यांनी पहिल्या विकेटसाठी 230 चेंडूत 269 धावांची भागीदारी केली. वॉर्नरने खेललेल्या एकूण 102 चेंडूत 106 धावा केल्या. तर हेडने 130 चेंडूत 152 धावा केल्या. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली स्टोन (Olly Stone) याने संघासाठी सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. वॉर्नर आणि हेड देखील स्टोनच्याच चेंडूवर विकेट गमावली.
ऑस्ट्रेलियाकडून विजयासाठी मिळालेले 356 धावांचे लक्ष्य इंग्लंडसाठी कठीण होते, पण त्यांचे फलंदाज अपेक्षेपेक्षा खूपच खराब खेळताना दिसले. सलामीवीर जेसन रॉय (Jeson Roy) याने सर्वात जास्त 33 धावांचे योगदान दिले. रॉयच्या साधीने डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला डेविड मलान अवघ्या 2 धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला जेन्स विन्स (James Vince) याने 22 धावा केल्या, पण याव्यतिरिक्त इंग्लंडचा एकही फलंदाज 20 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. पाच खेळाडूंना एक आकडी धावसंख्येवर विकेट गमावली.
गोलंदाजी विभागात ऑस्ट्रेसियासाठी ऍडम झंपा याने 5.4 षटकांमध्ये 31 धावा खर्च करून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्स आणि शॉन ऍबॉट यांनीही प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडला स्वस्तात गुंडाळले. तत्पूर्वी इंग्लंडसाठी ओली स्टोन याने 10 षटकांमध्ये 85 धावा खर्च करून चार विकेट्स घेतल्या. (England Lost by 221 runs in 3rd odi against Australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पावसाची दादागिरी! सुपर ओव्हर न खेळवता भारत- न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना टाय
एक हजार दिवसांची वाट पाहिल्यानंतर वॉर्नरच्या नावावर मोठा विक्रम, दिग्गज मार्क वॉ यांना नुकसान