---Advertisement---

आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव ठरला केवळ दुसराच फलंदाज, वाचा खास विक्रम

Suryakumar Yadav
---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघ १७ धावांनी पराभूत झाला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लडने २०० पेक्षा मोठे लक्ष्य दिले, जे भारतीय फलंदाज गाठू शकले नाहीत. भारतासाठी सूर्यकुमार यादवने शतकीय योगदान दिले, पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. इंग्लंडने १७ धावांनी हा सामना जिंकला, पण सूर्यकुमारने मात्र काही महत्वाचे विक्रम स्वतःच्या नावावर केले.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दुसरी सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज बनला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर शहरयार बट आहे, ज्याने २०२० मध्ये चेक रिपब्लीकनविरुद्धच्या एका टी-२० सामन्यात नाबाद १२५ धावांची खेळी केली होती. दुसऱ्या क्रमांकावरील सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्ध शुक्रवारी (१० जुले) ११७ धावांचे योगदान दिले. सूर्यकुमारने या धावा १४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने केल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन दिग्गज ग्लेन मॅक्सवेल आहे, ज्याने २०१९ मध्ये भारताविरुद्धच्या टी-२० सामन्यात नाबाद ११३ धावांचे योगदान दिले होते.

आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतना सर्वात मोठी खेळी करणारे खेळाडू

१२५* – शहरयार बट विरुद्ध चेक रिपब्लीकन (२०२०)
११७ – सूर्यकुमार यादव विरुद्ध इंग्लंड (२०२२)*
११३* – ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध भारत (२०१९)

उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने ७ विकेट्सच्या नुकसानावर २१५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ जेव्हा फलंदाजीसाठी आला, तेव्हा त्यांना २०० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. भारतीय संघाने मर्यादित २० षटकांमध्ये ९ विकेट्सच्या नुकसानावर १९८ धावा केल्या. या सामन्यात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) भारतासाठी दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने २८ धावांचे योगदान दिले.

कर्णधार रोहित शर्मा आणि रिषभ पंत डावाची सुरुवात करण्यासाठी आले आणि स्वस्तात बाद झाले. दोघांनी अनुक्रमे ११ आणि १ धाव करून विकेट गमावली. तिसऱ्या क्रमांकावरील विराट कोहलीही ११ धावांवर बाद झाला. भारताने पहिल्या तीन विकेट्स अवघ्या ३१ धावांवर गमावल्या होत्या, पण सूर्यकुमारच्या शतकी खेळीमुळे संघ सन्मानजनक धावसंख्या उभी करू शकला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

ना ना करते प्यार कर बैठे! मुथैय्या मुरलीधरनची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी

एकच वादा, सूर्या दादा! झंझावाती शतक करत सूर्यकुमारने जिंकली मने, ठरला पाचवाच भारतीय

भारतीय क्रिकेटर्स कोणत्या कार वापरतात माहित आहे का?, धोनीकडे तर आहे मोठे कलेक्शन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---