पुणे : मंगोलियामधील उलानबतार येथे जागतिक क्लासिक व इक्विप्ड पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत एकूण पाच सुवर्णपदक व एक रजत पदक यांसह इक्विप्ड पाॅवरलिफ्टिंग मध्ये मानाचा समजला जाणारा बेस्ट लिफ्टर ऑफ वर्ल्ड म्हणजेच “स्ट्रॉंग वुमन ऑफ वर्ल्ड” रनरअप चा किताबही शर्वरी यांनी पटकावला. जागतिक पातळीवर क्लासिक व इक्विप्ड असे दुहेरी सुवर्णपदक पटकावणाऱ्या पुण्याच्या डॉ. शर्वरी या भारतातील पहिल्या खेळाडू ठरल्या आहेत.
स्पर्धेत सुमारे ३७ देशांचे एकूण ५०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. पुण्याच्या डॉ. शर्वरी यांनी ५७ किलो महिला गटामध्ये ३५० किलो वजन उचलले. क्लासिक पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये जपान, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, हॉंगकॉंग, न्यूझीलंड, मंगोलिया, फिनलंड, यूएसए या देशाच्या स्पर्धकांना त्यांना कडवी झुंज द्यावी लागली.
जेनिफर मेकॉंमबी (हॉंग कॉंग ३४० किलो ) रिबेका कर्कपॅट्रिक (ग्रेट ब्रिटन ३४२.५ किलो) यांना हरवून डॉ. शर्वरी यांनी जागतिक क्लासिक सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. इक्विपड पाॅवरलिफ्टिंग मध्ये शर्वरी यांनी ३९५ किलो वजन उचलत पेरु च्या एलेना गुजमन (३५७.५ किलो) व मंगोलियाच्या ओयुनजर्गल (२१५ किलो) यांना मात दिली व भारतासाठी अजून एक जागतिक सुवर्णपदक खेचून आणले.
जागतिक स्पर्धेमध्ये आपल्यासाठी दोन वेळा राष्ट्रगीत वाजल्यामुळे कष्टाचे सार्थक झाल्याची भावना शर्वरी यांनी व्यक्त केली. या स्पर्धेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शर्वरी यांच्या आई डॉ. पूर्णा भारदे यांनी मास्टर थ्री (साठ वर्षापुढील गट) मध्ये क्लासिक प्रकारात चार ब्राॅंझ पदक व इक्विप्ड प्रकारात चार रजत पदकांची कमाई केली. राजम- आंध्रप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतून या दोघी मायलेकींची जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली होती. डॉ. वैभव इनामदार हे या दोघींचे प्रशिक्षक व मार्गदर्शक आहेत. शर्वरी या एम्.डी. आयुर्वेद असून सदाशिव पेठ येथे “आहार आयुर्वेद” नावाचे क्लिनिक व महेश सोसायटी येथे “कोड ब्रेकर” नावाची जिम चालवतात.
इक्विप्ड महिला प्रकारात भारताच्या संघाला रनर अपची टीम ट्रॉफी देखील मिळाली. एड. रवींद्रकुमार यादव, संजय सरदेसाई व पी. जे. जोसेफ यांचे भारताच्या खेळाडूंना मार्गदर्शन मिळाले. (In the world powerlifting competition, Double crown for Dr. Sharvari Inamdar)
महत्वाच्या बातम्या –
स्व. मोहन राजाराम नाईक सुवर्ण चषक कबड्डी स्पर्धा । विजय क्लब, श्रीराम क्रीडा विश्वस्त कुमार गटात अंतिम फेरीत
बाजीगर चहल! SMAT ट्रॉफीमध्ये युझीची खळबळ, अवघ्या 58 धावांत गारद केला विरोधी संघ