पुणे – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये दुसऱ्या सेमी फायनल मध्ये पालघर संघाने कोल्हापूर संघावर मात देत फायनल मध्ये प्रवेश मिळवला. सेमी फायनल सामन्याची सुरुवात अत्यंत सावध झाली होती. दोन्ही संघानी पहिला गुण एकाच चढाईत मिळवला. त्यानंतर मात्र कोल्हापूरच्या सौरभ फगारे, ओमकार पाटील व साहिल पाटील यांनी चढाई चपळाई ने गुण मिळवत पालघर संघाला ऑल आऊट करत 9-1 अशी आघाडी मिळवली. तर साईप्रसाद पाटील ने उत्कृष्ट पकडीचा खेळ करत गुण मिळवले. पालघरच्या प्रेम मंडळ ने अष्टपैलू खेळ करत गुण मिळवले. तर अभिनय सिंग ने 2 सुपर टॅकल करत सामन्यात रंगत आणली होती.
पालघर संघाने मध्यंतरा पूर्वी 3 सुवर टॅकल मध्ये 6 गुण मिळवत संघाची पिछाडी कमी केली. कोल्हापूर संघाने मध्यंतराला 19-12 अशी निर्यायक आघाडी घेतली होती. मध्यंतरा नंतर दोन्ही संघ डू और डाय रेड वर खेळण्याचा प्रवित्रा घेतला होता. प्रतिक जाधव ने चढाईत निर्यायक गुण मिळवत पालघर संघाची पिछाडी कमी केली. अभिनय सिंग ने हाय फाय पूर्ण केला. 7 मिनिटं शिल्लक असताना पालघर संघाने कोल्हापूर संघाला ऑल आऊट करत सामन्यात रंगत आणली. शेवटची 5 मिनिट शिल्लक असताना कोल्हापूर संघाकडे 25-23 अशी केवळ 2 गुणांची आघाडी होती.
पालघर संघाने शेवटच्या पाच मिनिटात पलटवार करत कोल्हापूर संघाला ऑल आऊट करत सामन्यात आघाडी मिळवली. पालघरच्या प्रतिक जाधव ने शेवटच्या सलग 6 चढाईत गुण मिळवत पालघर संघाला 35-28 असा विजय मिळवून दिला. पालघरच्या प्रतिक जाधव ने चढाईत 10 गुण मिळवले. जीत पाटील व अभिनय सिंग ने पकडीत प्रत्येकी 5 गुण मिळवत हाय फाय पूर्ण केले. प्रेम मंडळ ने सुद्धा पकडीत महत्वपूर्ण 3 गुण मिळवले. संपूर्ण सामन्यात कोल्हापूरचे चढाईपटू अपयशी ठरले.
बेस्ट रेडर- प्रतिक जाधव, पालघर
बेस्ट डिफेंडर- अभिनय सिंग, पालघर
कबड्डी का कमाल – प्रतिक जाधव, पालघर