Suryakumar Yadav Injury: भारतीय संघाचा धडाकेबाज फलंजाद सुर्यकुमार यादव सध्या दुखापती मुळे त्रस्त आहे. त्याच्या दुखापती बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. त्याच्या दुखापतीबद्दल जो अंदाज वर्तवला जात होता त्या पेक्षा दुखापत खूप मोठी असल्याचे समजत आहे. सध्याची परिस्थिती पाहता तो मैदानावर परतण्याची शक्यता कमीच दिसत आहे.
दक्षिण अफ्रिकेविरुध्दच्या टी20 मालिकेदरम्यान सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला दुखापती झाली होती. त्याने पहिल्या टी20 सामन्यात अफ्रिकेविरुध्द जबरदस्त शतक झळकवले होते. परंतु तिसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या घोट्याला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले.
सुर्यकुमार यादव आयपीएल पर्यंत फिट होण्याची शक्यता-
इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार सुर्यकुमार यादव आयपीएलपर्यंत फिट होण्याची अपेक्षा आहे. त्याला अपेक्षेपेक्षा जास्त काळ दुखापतीतून सावरायला लागू शकतो. हार्नियाच्या ऑपरेशननंतर त्याला त्याचा सराव सुरु करायला 8 ते 9 आठवडे लागू शकतात. आशा आहे की, तो आईपीएलपर्यंत फिट होईल.
आफ्रिके दौऱ्याहून परतल्यानंतर सुर्यकुमारने स्वत: चा स्कॅन केला होता. यानंतर तो बराच काळ संघातून बाहेर राहिला. सूर्यकुमारची दुखापत हा संघासाठी मोठा धक्का आहे. सूर्यकुमार यादव हा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जगातील नंबर वन फलंदाज आहे. अशा परिस्थितीत धडाकेबाज खेळाडूच्या दुखापतीमुळे भारतीय संघाची डोकेदुकी वाढली आहे. सूर्याची दुखापत विशेषत: टी20 विश्वचषकाच्या तयारी दरम्यान संघाचा समतोल राखण्यासाठी चांगले नाही. सूर्या लवकरात लवकर तंदुरुस्त होऊन मैदानावर परतेल अशी अपेक्षा आहे. (Increase in the problem of the Indian team Major update regarding Suryakumar Yadav’s injury)
हेही वाचा
सूर्यकुमार यादवचे मैदानात परतणे कठीण, दुखापतीबाबत मोठी अपडेट आली समोर
मोहम्मद शमीच्या दुखापतीबाबत धक्कादायक अपडेट, ‘या’ मोठ्या मालिकेतून होऊ शकतो बाहेर