भारतीय संघाने 19 वर्षांखीली वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडाक्यात एंट्री केली. बुधवारी (6 फेब्रुवारी) उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका संंघाला भारताने 48.5 षटकांमध्ये 2 विकेट्स राखून विजय मिळवला. यावर्षीच्या 19 वर्षांखाली विश्वचषकात अंतिम सामन्यात पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला आहे. उभय संघांतील हा उपांत्य सामना चाहत्यांसाठी पैसा वसून ठरला.
भारतीय संघाला या सामन्यात विजयासाठी 245 धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारतासाठी वरच्या फळीतील आदर्श सिंग याने शुन्य, अर्शिन कुलकर्णी याने 12, तर मुशीर खान याने 4 धावा करून विकेट गमावल्या. प्रियांशू मोलिया याने 5, तर सचिन धस याने 95 चेंडूत 96 धावांची सर्वोत्तम खेळी केली. कर्णधार उदय सहारन याने 124 चेंडूत 81 धावांचे योगदान दिले. अरावेली अवनीश याने 18 चेंडूत 10 धावा केल्या. मुरुगण अभिषेक याने शुन्यावर विकेट गमावला. राज लिंबानी याने 4 चेंडूत 13* धावा कुटल्या, ज्या भारताच्या विजयात महत्वाच्या राहिली. नमन तिवारी शुन्यावर नाबाद राहिला.
दक्षिण आफ्रिकेने या सामन्याच्या प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्सच्या नुकसान 244 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी सलामीवीर फलंदाज लुआन ड्रे प्रिटोरियस याने 102 चेंडूत 76 धावा केल्या. रिचर्ड सेलेट्सवेन याने 100 चेंडूत 64 धावांचे योगदान दिले. राज लिंबानी याने 9 षटकांमध्ये 60 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या. मुशीर खान याने 10 षटकांमध्ये 43 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या. नमन तिवारी आणि सौम्य पांडे यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
In 2016 WC – India qualified into final
In 2018 WC – India qualified into final
In 2020 WC – India qualified into final
In 2022 WC – India qualified into final
In 2024 WC – India qualified into finalDominance of India in U-19 level. 🇮🇳 pic.twitter.com/Yz8dwY05lN
— Johns. (@CricCrazyJohns) February 6, 2024
क्वेना माफाका आणि ट्रिस्टन लुस यांनी या सामन्यात प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. पण दक्षिण आफ्रिकेचा इतर एकही फलंदाज विकेट मिळवू शकला नाही. (IND U19 vs SA U19 NDIA REACHED THEIR 5TH CONSECUTIVE U19 WORLD CUP FINAL)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
19 वर्षांखालील भारतीय संघ: आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, प्रियांशू मोलिया, उदय सहारन (कर्णधार), सचिन धस, मुशीर खान, अरावेली अवनीश (यष्टीरक्षक), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी, सौम्य पांडे.
दक्षिण आफ्रिका अंडर-19: लुआन-ड्रे प्रिटोरियस (यष्टीरक्षक), स्टीव्ह स्टोल्क, डेव्हिड टीगर, रिचर्ड सेलेट्सवेन, दिवान माराईस, जुआन जेम्स (कर्णधार), ऑलिव्हर व्हाइटहेड, रिले नॉर्टन, ट्रिस्टन लुस, नकोबानी मोकोएना, क्वेना माफाका.
महत्वाच्या बातम्या –
दक्षिण आशियातील पहिली-वहिली महिला हँडबॉल लीग भारतात होणार, आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय स्टार खेळणार
मोठी बातमी! अर्जुन पुरस्कार विजेत्या हॉकीपटूवर बलात्काराचे आरोप! दोन दिवसांपूर्वीच झालेली डीएसपी पदी नियुक्ती