अहमदाबाद। सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम म्हणजेच मोटेरा स्टेडियमवर बुधवारपासून (२४ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना आहे. हा सामना सुरु होण्याआधी पुर्नबांधणी करण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमचा उद्घाटन सोहळा पार पडला.
या स्टेडियमचे उद्घाटन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यावेळी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, क्रीडामंत्री किरण रिजिजू, आदी मान्यवर देखील उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
जगातील सर्वात मोठे स्टेडियम
मोटेरा स्टेडियम हे पुर्नबांधणी केलेले स्टेडियम असून आता ते जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून ओळखले जाते. त्यामुळे भारत आणि इंग्लंड संघात होणारा तिसरा कसोटी सामना हा पुर्नबांधणी केलेल्या मोटेरा स्टेडियमवर होणारा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असल्याने दुपारी २.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
हे नवीन मोटेरा स्टेडियम जवळजवळ ६३ एकर जागेत बनले आहे. तसेच या स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत. या स्टेडियमची आसनक्षमता १ लाख १० हजार एवढी आहे. या नवीन स्टेडियममध्ये ७६ कॉर्पोरेट बॉक्स आहेत. यातील प्रत्येक बॉक्समध्ये २५ जणांची आसन क्षमता आहे. तसेच ५५ खोल्या असलेले क्लब हाऊसदेखील आहे. तसेच त्यात एक जीम आणि ऑलिंपिक साईज स्विमिंग पूल देखील आहे. त्याचबरोबर या स्टेडियममध्ये ३ प्रॅक्टीस ग्राउंड, १ इनडोअर क्रिकेट ऍकेडमीचीही सुविधा आहे.
Gujarat: President Ram Nath Kovind and his wife perform 'bhumi pujan' of Sardar Vallabhbhai Patel Sports Enclave in Ahmedabad's Motera
Union Home Minister Amit Shah, Sports Minister Kiren Rijiju and Gujarat Deputy Chief Minister Nitin Patel also present pic.twitter.com/vWlEnoTPQ1
— ANI (@ANI) February 24, 2021
भारतातील दुसराच दिवस – रात्र कसोटी सामना –
भारतातील हा दुसराच दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. याआधी कोलकाताच्या इडन गार्डन या स्टेडियमवर पहिल्यांदा भारत विरुद्ध बांगलादेश संघात दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात आला होता. तर भारतीय संघाचा हा एकूण तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. याआधी भारताने ऑस्ट्रेलियामध्ये ऍडलेड येथे देखील दिवस-रात्र कसोटी सामना खेळला आहे. तर इंग्लंड संघाचा हा एकूण चौथा दिवस-रात्र कसोटी सामना असेल.
प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी –
भारत-इंग्लंड संघात होणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्यासाठी ५५ हजार प्रेक्षक उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. कारण या स्टेडियमची आसन क्षमता १ लाख १० हजार इतकी आहे.
Motera in all readiness 😍
Just a few hours left for the #PinkBallTest #INDvENG @Paytm
ARE YOU READY 😎👌🏻 #TeamIndia pic.twitter.com/EdyGsLlQws
— BCCI (@BCCI) February 24, 2021
चौथा सामनाही मोटेरा स्टेडियमवर –
भारत आणि इंग्लंड संघात होणारा चौथा आणि कसोटी मालिकेतील शेवटचा सामना देखील मोटेरा स्टेडियमवरच होणार आहे. हा सामना सर्वसाधारण कसोटी सामन्यासारखाच असल्याने सकाळी ९.३० वाजता सुरु होईल.
मोटेरा स्टेडियमवर झाले होते ट्रम्प यांचे स्वागत –
बरोबर १ वर्षांपूर्वी म्हणजेच २४ फेब्रुवारी २०२० रोजी अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रेम्प हे भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांचे मोठ्या उत्साहात अहमदाबाद येथे स्वागत करण्यात आले होते. त्यावेळी मोटेरा स्टेडियमवर मोठा कार्यक्रमही घेण्यात आला होता.
मोटेरा स्टेडियमवर सय्यद मुश्ताक अलीचे सामने –
काही दिवसांपूर्वीच या स्टेडियमवर भारतातील देशांतर्गत स्पर्धा सय्य्द मुश्ताक अली टी२० ट्रॉफीच्या बाद फेरीचे आयोजन करण्यात आले होते. याच स्टेडियमवर तमिळनाडूने बडोद्याचा पराभव करत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
“रिमेंबर द नेम, कार्लोस ब्राथवेट” या ऐतिहासिक शब्दांचे जनक इयान बिशप्स
डे-नाईट टेस्टमध्ये भारताची आतापर्यंत कामगिरी कशी? पाहा एका क्लिकवर
ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहे अहमदाबादचं मोटेरा स्टेडियम!! याच मैदानात झालेत ‘हे’ खास विक्रम