न्यूझीलंड विरुद्ध भारत संघातील दुसरा वनडे सामना रविवारी (दि. 27 नोव्हेंबर) हॅमिल्टन येथे पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा माजी सलामीवीर वसीम जाफर याने संघातील दोन बदलांविषयी भाष्य केले आहे. त्याने दोन गोलंदाज बाहेर पडून त्यांच्या जागी दुसऱ्या दोन गोलंदाजांना संधी मिळू शकते असे म्हटले आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते दोन गोलंदाज, जे दुसऱ्या वनडेत संघात स्थान मिळवू शकतात.
भारतीय संघ पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडकडून 7 विकेट्सने पराभूत झाला होता. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला दुसरा वनडे सामना जिंकावा लागणार आहे. भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने यावर्षी 12 वनडेत 21 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, टी20 विश्वचषकात तो एकही सामना खेळला नव्हता. पहिल्या वनडेत चहलने 10 षटके गोलंदाजी करत 66 धावा खर्च केल्या होत्या.
यावर्षी टी20मध्ये भारताचा हुकमी एक्का म्हटल्या जाणाऱ्या अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने शानदार प्रदर्शन केले होते. मात्र, पहिल्या वनडेत त्याने 8.1 षटकात 68 धावा खर्च केल्या होत्या. यावेळी त्याला एकही विकेट घेता आली नव्हती.
काय म्हणाला वसीम जाफर?
माध्यमांनी वसीम जाफर (Wasim Jaffer) याच्या हवाल्याने सांगितले की, “दुसऱ्या वनडेत आपण चहलच्या जागी कुलदीप यादव याला पाहू शकतो. कारण, तो मिस्ट्री स्पिन टाकतो. तसेच, आपण अर्शदीप सिंग याच्या जागी दीपक चाहर याला पाहू शकते. कारण, तो फलंदाजीला मजबूती मिळवून देतो आणि चेंडू स्विंगही करतो.”
माजी क्रिकेटपटूचा असा विश्वास आहे की, पहिल्या वनडेत फॉर्मात नसलेला रिषभ पंत हा प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम असेल. तो म्हणाला, “चाहर संघात आल्याने फलंदाजीस खोली मिळेल आणि अव्वल फलंदाजी निर्भीड होऊन खेळू शकेल.”
वसीम जाफर याने म्हटले आहे की, भारताला पहिल्या वनडेतील आपल्या प्रदर्शनात सुधारणा करावी लागेल. तो म्हणाला, भारतीय गोलंदाजांना आपल्या लाईन आणि लेंथवर नियंत्रण ठेवावे लागेल. त्याने असा विश्वासही व्यक्त केला आहे की, भारतीय संघ न्यूझीलंडचा त्यांच्या देशात 13 सामने जिंकण्याचा क्रम रोखण्यात यशस्वी होईल. त्याने दुसऱ्या वनडेत भारतीय संघ पुनरागमन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. (ind v nz 2nd odi might see kuldeep chahar coming in for chahal arshdeep feels this indian cricketer)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयच्या कारवाईचे सत्र सुरूच, आणखी एका महत्वाच्या व्यक्तीची हकालपट्टी
जम्मू-काश्मीरचा जबरदस्त विक्रम! देशांतर्गत क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केली ‘अशी’ कामगिरी






