वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी भारतीय कसोटी संघात स्थान मिळवल्यानंतर पृथ्वी शाॅने शानदार शतक करत सर्वांची वाहवा मिळवली आहे.
आॅस्टेलियाचा माजी खेळाडू मार्क वाॅने त्याचे तोंड भरून कौतूक करताना म्हटले आहे. ”पृथ्वी शाॅमध्ये भारताचा महान खेळाडू सचिन तेंडूलकर आणि विडिंजचा दिग्गज ब्रायन लारा या दोघांचे गुण आहेत”.
Great prospect. Cross between B.Lara and Sachin Tendulkar.#goodcombination
— Mark Waugh (@juniorwaugh349) October 4, 2018
पृथ्वी शाॅ हा भारताकडून कसोटी खेळणार 293 वा फलंदाज ठरला आहे. याच वर्षी जानेवारी महिन्यात न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धा भारतीय संघाने त्याच्या नेतृत्वाखाली जिंकली होती.
पृथ्वी शाॅने कसोटी, रणजी ट्राॅफी आणि दुलीप करंडक स्पर्धेत पदार्पणात शतक करण्याचा विक्रम केला आहे.
इंग्लडचा माजी कर्णधार मायकल वाॅनने म्हटले आहे की ”18 व्या वर्षी शतक करणारा पृथ्वी शाॅ हा भारतीय क्रिकेटमधील आणखी एक उगवता तारा आहे”.
Wow .. 18 yrs old @PrithviShaw .. Test ???? on debut .. Looks like #India have another superstar that has arrived on the scene !!! #INDvWI
— Michael Vaughan (@MichaelVaughan) October 4, 2018
आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्क वाॅने कसोटी पदार्पणातच शतक करण्याचा विक्रम केला होता. मार्क वाॅने 128 कसोटी आणि 244 वन-डे सामने खेळले आहे.
महत्वाच्या बातम्या-






