भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी संघ सध्या दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आमने सामने आहेत. उभय संघांतील बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा हा दुसरा कसोटी सामना आहे. दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहली याने भारतासाठी 44 धावांचे योगदान दिले. पण त्याने ज्या पद्धतीने विकेट गमावली, याची अधिक चर्चा होत आहे. विराटला बाद दिल्यानंतर पंचांवर चाहते प्रश्न उपस्थित करत आहेत. पंचांच्या निर्णायानंतर विराट ड्रेसिंग रूममध्ये आगपाखड करताना दिसला. विराटचे हेच वागणे माजी दिग्गज गौतम गंभीर याला मात्र पटले नाही.
मैदानी पंच नितीन मेनन यांनी विराट कोहली (Virat kohli) याला बाद दिल्यानंतर त्याने रिव्यू घेतली. पण तिसऱ्या पंचांना देखील अंतिम निर्णय देण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. भारताच्या पहिल्या डावातील 50 व्या षटकात विराटने स्वतःची विकेट गमावली. संघाची धावसंख्या 135 असताना विराटच्या रूपात संघाला सहावा झटका मिळाला. विराटने 84 चेंडूचा सामना करत 44 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण करणाऱ्या मॅथ्यू कुह्नेमन (Matthew Kuhnemann) याने विराटची विकेट घेतली. पण या विकेटमुळे सध्या वाद सुरू झाल्याचे दिसत आहे. स्वतः विराट देखील पंचांच्या निर्णयामुळे नाराज दिसत आहे. त्याने ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर त्याठिकाणची खुर्ची आपटल्याचेही पाहायला मिळाले.
भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज आणि सध्या समालोचकीच भूमिका पार पाडणाऱ्या गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला विराटचे हे वागणे पटले नाही. गंभीर म्हणाला की, “विराटला काहीच अधिकार नाहीये की, त्याने ड्रेसिंग रूममध्ये जाऊन अशा पद्धतीचे वर्तण करावे. जर हा निर्णय ऑस्ट्रेलियन संघाच्या विरोधात दिला गेला असता, तर त्यांनी ड्रेसिंग रूममध्ये अशा पद्धतीचे वर्तन केले नसते.”
विराटच्या विकेटबर काय बोलला गंभीर
विराट कोहली बाद होता की नाही, यात तिसऱ्या पंचांना देखील संशय असल्याचे पाहायला मिळाले. निर्णय कठीण अशल्यामुळे अखेर तिसऱ्या पंचांनी मैदानी पंच नितीन मेनन यांचा निर्णय कायम राहण्याचे ठरवले. “आपल्यासाठीचा हा निर्णय किती अवघड आहे. आपण 100 टक्के खात्रीने सांगू शकत नाही. अशात नितीन मेननसाठी हा निर्णय किती महत्वाचा असेल. तिसऱ्या पंचांकडे अनुभव आहे तरीही त्यांना नीट समजू शकले नाही.” (IND va AUS Gautam Gambhir criticized Virat Kohli as he got angry in the dressing room)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इमर्जन्सीमध्ये संघात आला आणि विराटची ‘ड्रीम विकेट’ घेऊन गेला, कुह्नेमनचे दमदार पदार्पण
जबरदस्त! जिमी अन् ब्रॉडचा जागतिक क्रिकेटमध्ये राडा, मोडला वॉर्न-मॅकग्रा जोडीचा ‘तो’ World Record