---Advertisement---

विराटच्या बहुप्रतिक्षित शतकासह टीम इंडियाचा अफगाणिस्तानविरुद्ध 212 धावांचा डोंगर

Virat Kohli
---Advertisement---

भारतीय संघ आशिया चषक 2022 च्या अंतिम सामन्यात पोहोचू शकला नाही. परंतु सुपर फोरमधील शेवटच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. दिग्गज विराट कोहली आशिया चषकात जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे दिसले आहे. त्याने तब्बल 2 वर्ष आणि 10 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय शतक केल्यामुळे चाहत्यांची मने सुखावली आहेत. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 2 विकेट्सच्या नुकसानावर 212 धावांचा डोंगर उभा केला. 

भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्यात खेळत नव्हता. त्याच्या जाही केएल राहुल (KL Rahul) सोबत दिग्गज विराट कोहली (Virat Kohli) डावाची सुरुवात करण्यासाठी आला. विराटने अवघ्या 61 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने 122 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 12 चौकार आणि 6 षटकार मारले. शतक पूर्ण करण्यासाठी त्याला अवघ्या 53 चेंडूंची आवश्यकता भासली.

विराटव्यतिरिक्त केएल राहुलने देखील चमकदार कामगिरी केली. त्याने 41 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 62 धावा चोपल्या. सूर्यकुमार यादवने आल्या-आल्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि पुढच्या चेंडूवर बाद देखील झाला. रिषभ पंत देखील नाबाद 20 धावा करून शेवटपर्यंत विराटसोबत खेळपट्टीवर कायम होता. अफगाणिस्तानसाठी फरीत अहमद (Fareed Ahmad) याने 57 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या.

बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 
अखेर प्रतिक्षा संपली! ‘किंग कोहली’चे 2 वर्ष आणि 10 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय शतक
ICC Team Ranking | ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पराभव न्यूझीलंडाला चांगलेच पडले महागात, ‘हा’ संघ बनला नंबर वन
पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर रोहितचा पत्ता कट! अफगाणिस्तानविरुद्ध ‘हा’ खेळाडू करणार कॅप्टन्सी  

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---