विश्वचषक 2023 स्पर्धेतील नववा सामना भारतीय संघासाठी खूपच खास ठरला. या सामन्यात भारताने शानदार खेळाडूंनी सजलेल्या अफगाणिस्तान संघाचा 8 विकेट्सने दारुण पराभव केला. सलग दुसऱ्या विजयासह भारताने गुणतालिकेत दुसरे स्थान काबीज केले. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा हादेखील चमकला. त्याने अवघ्या 63 चेंडूत विश्वचषकाच्या इतिहासातील आपले सातवे शतक पूर्ण केले. याव्यतिरिक्त भारताने सामन्यात विक्रमांची भिंतच उभी केली. चला तर, भारताचे विक्रम पाहूयात…
भारतीय संघ (Team India) विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत लय कायम राखण्यात यशस्वी राहिला आहे. आपल्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने दिलेल्या 273 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी शानदार सुरुवात केली. यावेळी रोहितने यावेळी शतक (131) साजरे केले. तसेच, इशानने (47) चांगली साथ दिली. त्यांच्यात 156 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याने पहिल्या सामन्यातील लय कायम राखली. त्याने सामन्यात नाबाद 55 धावा केल्या, तर श्रेयस अय्यर हादेखील 25 धावांवर नाबाद राहिला.
या सामन्यातील भारताच्या विजयानंतर अनेक विक्रम नावावर झाले. ते पुढीलप्रमाणे-
विश्वचषकात भारताने केलेला आव्हानाचा यशस्वी पाठलाग
288 विरुद्ध- झिम्बाब्वे, ऑकलंड, 2015
275 विरुद्ध- श्रीलंका, मुंबई, 2011 अंतिम सामना
274 विरुद्ध- पाकिस्तान, सेंच्युरियन, 2003
273 विरुद्ध- अफगाणिस्तान, दिल्ली, 2023*
265 विरुद्ध- श्रीलंका, हेडिंग्ले, 2019
दिल्लीत वनडेतील सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग
278 – भारत विरुद्ध श्रीलंका, 1982
273 – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 2023*
272 – श्रीलंका विरुद्ध भारत, 1996
239 – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1986
238 – भारत विरुद्ध इंग्लंड, 2011
विश्वचषकात 250हून अधिक धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना सर्वाधिक रनरेट
7.8 – (273/2) – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली, 2023*
7.78 – (283/1) – न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, अहमदाबाद, 2023
7.75 – (322/3) – बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, टाँटन, 2019
7.13 – (345/4) – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, हैदराबाद, 2023
7.05 – (260/2) – भारत विरुद्ध आयर्लंड, हॅमिल्टन, 2015
भारतासाठी पहिल्या पॉवरप्लेमधील सर्वोच्च धावसंख्या
97/2 विरुद्ध श्रीलंका, होबार्ट, 2012
94/0 विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली, 2023
91/1 विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, 2021
87/0 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नागपूर, 2011
83/1 विरुद्ध वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन, 2019
विश्वचषकात 7व्यांदा 250हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग
विशेष म्हणजे, विश्वचषकात 250हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची ही भारताची 7वी वेळ आहे. इतर कोणत्याही संघाला 5 पेक्षा जास्त वेळा हा विक्रम करता आला नव्हता. दुसरीकडे, कर्धणार रोहित शर्मा यानेही विश्वचषकाच्या इतिहासात 7 शतके झळकावत सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडला. सचिनच्या नावावर विश्वचषकात 6 शतके करण्याचा विक्रम आहे. (ind vs afg match record team india 7th successful chase of 250 or more in world cups)
हेही वाचा-
भारत-अफगाणिस्तान सामन्याला गालबोट! स्टेडिअममध्ये चाहत्यांमध्ये तुंबळ हाणामारी- व्हिडिओ
अफगाणिस्तानविरुद्ध 4 विकेट्स घेणारा बुमराह स्वत:च्या प्रदर्शनावर नाही खुश, कारण घ्या जाणून