---Advertisement---

‘जितेश-सॅमसन रोहित शर्माची पहिली पसंती नाहीत?’ माजी भारतीय क्रिकेटपटूने सांगितले धक्कादायक कारण

Jitesh-Sharma-And-Sanju-Samson
---Advertisement---

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी20 मालिकेतील दुसरा सामना इंदूरमध्ये होणार आहे. भारतीय संघ यासाठी पूर्णपणे तयार आहे. भारताने पहिला सामना जिंकला होता. आता त्यांची नजर मालिका विजयावर असेल. या मालिकेसाठी भारताकडे दोन यष्टीरक्षक पर्याय असतील. संघाने जितेश शर्मा आणि संजू सॅमसन याला संधी दिली आहे. मात्र हे दोघेही रोहित शर्मा याची पहिली पसंती नसतील, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याने व्यक्त केले आहे.

भारतीय संघाने मोहालीत झालेल्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जितेश शर्मा (Jitesh Sharma) याचा समावेश केला होता. जितेशने 20 चेंडूंचा सामना करत 31 धावा केल्या. यावेळी त्याने 5 चौकार मारले. जितेशने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. यासोबतच देशांतर्गत मध्येही त्याचा चांगला रेकॉर्ड आहे. यामुळे तो भारतीय संघात स्थान मिळवू शकला. संजु सॅमसन (Sanju Samson) याचा देशांतर्गत विक्रमही चांगला आहे. पण त्याला भारतीय संघात फार कमी संधी मिळाल्या. आता त्याचा संघात समावेश झाला असूनही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळत नाही. (ind vs afg suresh raina said rishabh pant first choice for wicket keeper rohit sharma team india)

एनडीटीव्हीच्या एका बातमीनुसार, सुरेश रैना (Suresh Raina) म्हणाला, “मला वाटते संजू सॅमसन हे एक चांगले शस्त्र आहे. तो कुठेही फलंदाजी करू शकतो. जितेशच्या बाबतीतही तेच आहे. पण मला वाटते की, रोहित शर्मा (Rohit Sharma) याची पहिली पसंती रिषभ पंत (Rishabh Pant) असेल. पंत पुनरागमनाच्या तयारीत आहे. इशान किशन (Ishan Kishan) हा देखील एक पर्याय आहे. जितेशला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तो चांगली कामगिरी करतो.”

रिषभ पंत कार अपघातानंतर क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, आता तो मैदानात परतण्याची तयारी करत आहे. पंत बऱ्यापैकी सावरला आहे. फिटनेसमुळे तो 2023 विश्वचषक स्पर्धेत खेळू शकला नाही. मात्र, त्याच्या परतण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Samson-Jitesh not Rohit Sharma’s first choice? The former Indian cricketer said the big reason)

हेही वाचा

IND vs AFG: इंदोरमध्ये आज भारत-अफगाणिस्तान भिडणार, पाहा कशी असेल खेळपट्टी आणि संघांची संभावीत प्लेइंग-11
‘आता कोणी रोखून दाखवा’, भारतीय संघात निवड झालेल्या युवा फलंदाजाबद्दल मित्राची लक्षवेधी पोस्ट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---