---Advertisement---

हार्दिक पंड्याने बर्थडे बनवला खास, अफगाणी खेळाडूचा त्रिफळा उडवल्यानंतरची रिएक्शन व्हायरल

On: बुधवार, ऑक्टोबर 11, 2023 6:41 PM
hardik Pandya
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023चा 9वा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळताना भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्या चांगलाच उत्साहात दिसला. अफगाणिस्तानच्या अजमतुल्लाह ओमरझाई याने संघासाठी अर्धशतकी खेळी केली. पण त्यानंतर हार्दिक पंड्याने त्याचा त्रिफळा उडवला.

उभय संघांतील या सामन्याची नाणेफेक अफगाणिस्तानने जिंकली आणि भारताला प्रथम गोलंदाजी करावी लागली. अफगाणिस्तानने 50 षटकात 272 धावा उभ्या केल्या. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने टाकलेल्या 10 षटकांमध्ये 7 षटकात 43 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या. रहमानुल्लाह गुरबाज आणि अजमतुल्लाह ओमरजाई यांच्या विकेट्स अष्टपैलूला मिळाल्या. यातील अजमतुल्लाह ओमरजाई याला हार्दिकने त्रिफळाचीत केले. ही विकेट घेतल्यानंतर हार्दिकची रिएक्शन पाहण्यासारखी होती. आयसीसीनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे हार्दिक बुधवारी (11 ऑक्टोबर) आपला 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. अशात या सामन्यातील त्याचे प्रदर्शन आणि उत्साह पाहून सोशल मीडियावर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

https://www.instagram.com/reel/CyQblCnv-f8/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, भारतासाठी या सामन्यात सर्वाधिक 4 विकेट्स जसप्रीत बुमराह याने घेतल्या. यासाठी त्याने 10 षटकांमध्ये 39 धावाही खर्च केल्या. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (IND vs AFG The Celebration From Birthday Boy Hardik Pandya After The Wicket)

स्पर्धेच्या नवव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

अफगाणिस्तान – रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, अजमतुल्लाह ओमरजाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी

महत्वाच्या बातम्या – 
इथे सुट्टी नाही! मैदानात उतरताच नवीनला प्रेक्षकांनी घेतले फैलावर, लागले कोहली..कोहलीचे नारे 
“एका पायावर…” मॅच विनर मोहम्मद रिझवानचे भारतीय दिग्गजाकडून कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---