IND vs AFG 3rd T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना बुधवार (17 जानेवारी) रोजी बेंगलोरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे, ज्यासाठी दोन्ही संघ आधीच या ठिकाणी पोहोचले आहेत. यजमान संघाने मंगळवारी पहिले सराव सत्र केले. यावेळी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हाही इतर खेळाडूंसोबत सराव सत्रात सामील झालेला पाहायला मिळाला.
भारतीय संघाच्या सराव सत्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये रिषभ पंत (Rishsbh Pant) विराट कोहलीशी (Virat Kohli) बोलताना दिसत आहे. त्याचवेळी डावखुरा फलंदाज युवा फलंदाज रिंकू सिंगसोबत विनोद करतानाही दिसला. (ind vs afg watch rishabh pant joins team india camp at bengaluru interactions virat kohli)
26 वर्षीय पंत सध्या बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत आहे. डिसेंबर 2022 मध्ये त्याच्या कारला अपघात झाला होता. ज्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि सध्या तो रिकव्हर होत आहे. पंत पुन्हा मैदानात परतण्यासाठी मेहनत घेत आहे.
Virat Kohli and Rishabh Pant together in practice session at Chinnaswamy.
– Video of the Day! pic.twitter.com/Cq1Dj5j5ik
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 16, 2024
मंगळवारी (16 जानेवारी) त्याने आपल्या वर्कआउटचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज वेगवेगळ्या प्रकारची कसरत करताना दिसत होता आणि त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “घामाचा प्रत्येक थेंब आपल्या ध्येयाच्या एक पाऊल जवळ आहे.”
View this post on Instagram
रिषभ पंत आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये पुनरागमन करेल अशी आशा आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्याला आगामी हंगामासाठी कायम ठेवले असून संघाचा कर्णधार म्हणूनही त्याची नियुक्ती केली आहे. दुबईत 17व्या हंगामासाठी आयोजित मिनी लिलावातही पंत सहभागी झाला होता आणि बोली टेबलवर खेळाडूंवर बोली लावताना दिसला. यानंतर त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (Ms Dhoni) आणि त्याच्या कुटुंबासोबत तिथे ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे केले. (IND vs AFG Pant seen practicing with Team India players had an exclusive chat with Kohli)
हेही वाचा
‘असा गुण जो विराट, सचिन आणि धोनीमध्येही नाही?’ दादाने दिले एका शब्दात जबरदस्त उत्तर
Gujarat Titans । संघाला फरक पडत नाही! हार्दिक पंड्याबाबत मोहम्मद शमीचे मोठे विधान