भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळला जात आहे. ज्यात कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यशस्वी जयस्वाल आणि देवदत्त पडिक्कल खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. तर विराट कोहलीने 5 धावा केल्या. 47 च्या स्कोअरवर भारताने चाैथी विकेट गमावली. रिषभ पंतसोबत ध्रुव जुरेल क्रीजवर आहे. भारतीय प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे तर, वॉशिंग्टन सुंदर हा संघाचा एकमेव फिरकी गोलंदाज खेळत आहे. हर्षित राणा आणि नितीश रेड्डी प्रथमच कसोटीत पदार्पण करत आहेत.
भारताला पहिला धक्का यशस्वी जयस्वालच्या रूपाने 5 धावांवर बसला. जयस्वाल खाते न उघडता मिचेल स्टार्कचा बळी ठरला. जोश हेझलवूडने 11व्या षटकात देवदत्त पडिक्कलला बाद करून भारताला दुसरा धक्का दिला. तर विराट कोहलीकडून देखील पुन्हा निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. त्याला केवळ 5 धावा करत्या आल्या. जोश हेझलवुडने त्याला उसळत्या चेंडूवर बाद केले. एक टोक सांभाळून खेळत असलेल्या केएल राहुलला देखील परत जावे लागले. मिचेल स्टार्कने केएल राहुलच्या रूपाने भारताला चौथा धक्का दिला. केएल राहुल 26 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. लंचब्रेक पर्यंत भारत 25 षटकांत 51/4 अश्या स्थितीत आहे. सद्या रिषभ पंत आणि ध्रुव जुरेल क्रीझवर आहेत. गोलंदाजीत आतापर्यंत मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूडने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या आहेत.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
ऑस्ट्रेलिया- उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड
भारत- केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज
हेही वाचा-
अश्विन-जडेजाशिवाय भारत शेवटचा कधी खेळला? गेल्या 10 वर्षात 5व्यांदा असं घडलं
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियासाठी स्टार खेळाडूंचे पदार्पण, कोहली-अश्विनने दिली कॅप
IND VS AUS; टीम इंडियाचा टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय, या दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी