भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांचे वादाशी घनिष्ट नाते राहिले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेक खेळाडूंशी त्यांचे खटके उडाले आहेत. अशात मांजरेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते यावेळी भारतीय संघाचा माजी खेळाडू मुरली विजय याच्या निशाण्यावर आले आहेत. त्याने ट्वीट करत मांजरेकरांवर आगपाखड केली आहे. विशेष म्हणजे, त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयलादेखील टॅग केले आहे. चला संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया…
मुरली विजयचे ट्वीट
मुरली विजय (Murali Vijay) याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांना झापले आहे. त्याने ट्वीट करत लिहिले आहे की, “मुंबईचे काही माजी खेळाडू कधीच दाक्षिणात्य क्रिकेटपटूंना चांगले बोलूच शकत नाहीत.” मुरलीने या ट्वीटमध्ये बीसीसीआयसोबतच संजय मांजरेकर यांनाही टॅग केले आहे. त्यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला आहे. तसेच, समजते की, मुरली कुणाबद्दल असे बोलत आहे.
https://twitter.com/mvj888/status/1623905280013799424
खरं तर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ पहिला डाव खेळत होता. लंचच्या काही वेळाआधी टीव्हीवर आकडे दाखवण्यात आले. त्यात हे सांगण्यात आले की, कोणत्या खेळाडूचा कन्व्हर्जन रेट (अर्धशतकाला शतकात बदलण्याच्या बाबतीत) चांगला आहे. यामध्ये मुरली विजय अव्वलस्थानी दिसला. त्याच्या खाली मोहम्मद अझरुद्दीन, पॉली उम्रीगर, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे खेळाडू होते.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1623895325663707137
काय म्हणाले होते मांजरेकर?
टीव्हीवर ही आकडेवारी दाखवल्यानंतर समालोचन करत असलेल्या मांजरेकरांनी म्हटले की, “मला आश्चर्य होत आहे की, मुरली विजय अव्वलस्थानी आहे.” मांजरेकरांच्या या वक्तव्याने मुरली विजय भलताच संतापला. त्याने लगेच ट्वीट करत म्हटले की, “संजय मांजरेकर हैराण आहेत, व्वा.” यानंतर तो त्याने आणखी एक ट्वीट करत लिहिले की, “मुंबईचे काही खेळाडू कधीच दाक्षिणात्य खेळाडूंची प्रशंसा करू शकत नाहीत.”
https://twitter.com/mvj888/status/1623898347412279296
मुरली विजयने घेतली निवृत्ती
मुरली विजय याने 30 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. 38 वर्षीय मुरलीने 61 कसोटीत 12 शतकांच्या मदतीने भारताकडून 3982 धावा चोपल्या आहेत. याव्यतिरिक्त 17 वनडे सामन्यात त्याने 339 धावा आणि 9 आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 169 धावा केल्या आहेत. (ind vs aus 1st test murali vijay angry on sanjay manjrekar amid nagpur test stats related to virat kohli rohit sharma read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फ्लॉप होऊनही राहुलला फलंदाजी प्रशिक्षकाचा भक्कम पाठिंबा का? म्हणाले, ‘केएलसाठी प्रामाणिकपणे सांगतो…’
भारताने नागपुरात वापरली 2017ची रणनीती, ‘हे’ तीन धुरंधर नेहमीच वाजवतात विरोधी संघाची बँड; एकदा वाचाच





