रविंद्र जडेजा याने मोठ्या काळानंतर पहिला भारतीय संघासाठी मैदानात पुनरागमन केले. पुनरागमनाच्या सामन्यात जडेजाने पहिल्या डावाती 36 व्या षटकात ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दोन धक्के दिले. खेळपट्टीवर पाय रोवलेला मार्नल लाबुशेन आणि मॅट रेनशॉ यांनी या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर विकेट गमावली. संघाची धावसंख्या 84 असताना ऑस्ट्रेलियाने चार विकेट्स गमावल्या.
ऑगस्ट 2022 मध्ये रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आशिया चषक 2022 मध्ये हाँगकाँगविरुद्ध खेळताना भारताने 40 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यानंतर जडेजा भारतासाठी थेट फेब्रुवारी 2023 म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळताना दिसला. दरम्यानच्या काळात जडेजा दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. त्याच्या पायाची मोठी शस्त्रक्रिया देखील पार पडली. पुनरागमनाच्या सामन्यात जडेजाने मार्नल लाबुशेन आणि मॅट रेनशॉ () यांना लागोपाठ चेंडूवर तंबुचा रस्ता दाखवला.
लाबुशेन सुरुवातीच्या षटकांपासून खेळत आला होता. त्याने 123 चेंडूत 49 धावा केल्या होत्या आणि पुढे मोठी खेळी करण्याची अपेक्षा ऑस्ट्रेलियन संघाला त्याच्याकडून होती. जडेजाने मात्र ऑस्ट्रेलियन संघाच्या अपेक्षांवर पाणी फेरले. जडेजाइतकेच योगदान केएस भरत () याचेही राहिले. जडेजाने टाकलेल्या चेंडूवचा अंदाच लाबुशेनला आला नाही आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात पोहोचला. भरतने क्षणाचा विलंब न करता चेंडू स्टंप्सला लावल्यामुळे लाबुशेनला खेळपट्टी सोडावी लागली.
षटकातील शेवटचा चेंडू देखील जडेजाने अप्रतिम टाकला. लाबुशेन बाद झाल्यानंतर मॅट रेनशॉ खेळपट्टीवर आला होता. सामन्यातील पहिल्याच चेंडूचा सामना करत अशताना त्याने विकेट गमावली. जडेजाचा हा चेंडू रेनशॉच्या पायावर लागला आणि तो पायचीत झाला. पहिल्या डावातील 42 व्या षटकात ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव स्मिथ देखील जडेजाच्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला. जडेजाने या सामन्यात ज्या पद्धतीने पुनरागमन केले, त्यासाठी सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे.
JADEJA is M. O. O. D! 😊👊
A huge wicket for #TeamIndia as Steve Smith is dismissed! 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/SwTGoyHfZx #INDvAUS | @imjadeja | @mastercardindia pic.twitter.com/9NAPz5Lt1D
— BCCI (@BCCI) February 9, 2023
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स याने सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी ऑस्ट्रेलियन संलामीवारांना प्रत्येकी एक-एक धाव केल्यानंतर बाद केले. सिराजने उस्मान ख्वाजा तर शमीने डेविड वॉर्नरला तंबूत धाडले. (Ravindra Jadeja took three wickets along with Marnus Labuchen and Steve Smith in the comeback Test match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत vs ऑस्ट्रेलिया कसोटी।भारतीय तोफखान्याचा ऑस्ट्रेलियाला दणका! दोन्ही सलामीवीर 10 मिनिटात तंबूत
एकीकडे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात काँटे की टक्कर, दुसरीकडे धोनी ट्रॅक्टरने नांगरतोय शेती, व्हिडिओ तुफान व्हायरल