ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघ (INDvsAUS) तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (20 सप्टेंबर) मोहाली, पंजाब येथे खेळला जाणार आहे. ही मालिका सुरू होण्याआधीच भारतीय संघाला धक्का बसला. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला कोरोना झाल्याने तो मालिकेबाहेर झाला आहे. तर त्याच्या बदल्यात उमेश यादव याची संघात वर्णी लागली आहे. त्याने 2019नंतर एकही आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला नाही. तर त्याला संघात घेतल्याने सोशल मीडियावर चर्चेला उधान आले आहे. तर त्याला संघात घेण्याचे कारण रोहित शर्माने स्पष्ट केले आहे.
उमेश यादव (Umesh Yadav) याला मोहम्मद शमी (Mohammad Shami) याच्याजागी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघात घेतले. उमेश भारताच्या टी20 संघात तब्बल तीन वर्षापेक्षा अधिक काळानंतर परतला आहे. तर 43 महिन्यानंतर तो टी20 मालिका खेळणार आहे. अशात त्याला संघात का घेतले याबाबत प्रश्न निर्माण केले जात आहे. याला पूर्णविराम भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने दिला आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेआधी झालेल्या पत्रकार परिषदेत याचे स्पष्टीकरण दिले आहे.
“उमेश, शमी यांना गोलंदाजी करण्याचा अधिक अनुभव आहे. ते मोठ्या काळापासून गोलंदाजी करत आहेत. त्यांना एकाच प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळणे आवश्यक नाही. ते ज्या प्रकारमध्ये खेळले आहेत, त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांची गुणवत्ता योग्य असून ते जर फिट असतील तर त्यांना संघात परत बोलावले जाईल,” असे रोहितने म्हटले आहे.
रोहितने पुढे उमेशच्या आयपीएलची कामगिरीचा उल्लेख केला आहे. रोहित म्हणाला, “आयपीएलमुळे त्याची टी20 मधील क्षमता पुढे आली आहे. तो अधिक स्विंगने गोलंदाजी करत त्यामध्ये वेगही असतो. अशीच गोलंदाजी आम्हाला हवी होती.”
रोहित म्हणाला, “प्रसिध जखमी आहे तर, सिराज काउंटी क्रिकेटमध्ये खेळत आहे. यामुळे उमेशला संघात घेतले आहे. त्याने आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने 2022च्या आयपीएलमध्ये प्रभावशाली गोलंदाजी केली आहे. तो नवीन चेंडूने घातक ठरला आहे.”
उमेशने 2022च्या आयपीएलचा हंगाम कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला. त्याने 12 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या होत्या. ज्यामध्ये त्याने एका सामन्यात चार विकेट्स घेतल्या आहेत.
उमेशने रॉयल लंडन वनडे कपमध्ये त्याने मिडलसेक्स संघासाठी 7 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत. तो मिडलसेक्स संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे, पण दुखापत झाल्यामुळे त्याला मायदेशात परतावे लागले होते. बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याने स्वतःचे रिहॅबिलिटेशन पूर्ण केले, पण इतक्यातच चार दिवसीय क्रिकेट खेळत्यावर त्याला पुन्हा दुखापत होण्याची दाट शक्यता होती. याच पार्श्वभूमीवर एनसीएच्या मेडिकल टीमने त्याला इतक्यातच चार दिवसीय क्रिकेट न खेळण्याचे संकेत दिले.
मिडलसेक्सने 16 सप्टेंबर रोजी उमेश यादव संघासाठी उपस्थितीत राहणार असल्याची माहिती देखील दिली होती. अशात आता त्याला भारताच्या टी-20 संघात संधी मिळाल्यामुळे एनसीएचा सल्ला त्याच्यासाठी फायदेशीर ठरल्याचेच दिसते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी पूर्णपणे तुटलो होतो…’, वेस्ट इंडीज दौऱ्यातून वगळल्यामुळे ‘अशी’ झालेली स्टुअर्ट ब्रॉडची अवस्था
“त्याने स्वतःला सिद्ध केलंय”, या खेळाडूच्या कामगिरीने रोहित झालाय भलताच खुश
भारतीय खेळाडूंच्या दुखापतीचे सत्र थांबेना! आता ‘हा’ वेगवान गोलंदाज महत्वाच्या मालिकेपूर्वी संघातून बाहेर